industry 
पुणे

कोरोनामुळे 78 टक्के लघु, सूक्ष्म उद्योगांचे काम बंद 

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाचा देशभरातील उद्योग आणि सामाजिक क्षेत्रावर गंभीर परिणाम होत असून, आर्थिक उदासीनता, शून्य महसूल निर्मिती यामुळे सुमारे 78 टक्के लघु, सूक्ष्म उद्योगांना (एमएसएमईंना) आपले कामकाज बंद करावे लागल्याचे डेटा विश्‍लेषक-आधारित बॅंकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी "स्पोक्‍टो'ने केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे. 

स्पोक्‍टोने "द ग्राउंड ट्रुथ-व्हॉइस ऑफ इंडियन बॉरोव्हर्स' अंतर्गत मुदत कर्ज देणाऱ्या संस्थांचा आणि ग्राहकांचा अभ्यास केला. मुंबई, पुणे, नवी दिल्ली, बंगळुरू आदींसारख्या 185 शहरांमधून "स्पोक्‍टो'ने हा अभ्यास करून निष्कर्ष काढला आहे. सुमारे 59 टक्के ग्राहकांचे कोरोनाच्या काळात उत्पन्नात नुकसान झाले आहे. तर केवळ 4 टक्के ग्राहकांच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही. सध्याच्या कामगार शक्तीतील 34 
टक्के कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. 

दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सुमारे 56 टक्के ग्राहकांनी वैयक्तिक कर्ज घेतले आहे तर गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांची संख्या 23 टक्के आहे. यानंतर व्यावसायिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचा (17 टक्के), कार लोन (16 टक्के), दुचाकी कर्ज (15 टक्के), इतर कर्ज (5 टक्के) यांचा क्रमांक लागतो. एकूण खातेदारांपैकी 76 टक्के लोकांनी ईएमआयमध्ये 50,000 रुपयांची लहान कर्जे घेतली आहेत. 

पुढच्या वर्षभराचा विचार केल्यास 38 टक्के ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या कर्जाची गरज भासणार नसून, 37 टक्के ग्राहकांना मात्र लग्न, शिक्षण यांसारख्या वैयक्तिक खर्चकरिता कर्जाची आवश्‍यकता असणार आहे. 16 टक्के ग्राहकांना गृहकर्जाची आवश्‍यकता भासणार असून, स्वतःचे वाहन विकत घेण्यासाठी 9 टक्के ग्राहकांना कर्जाची गरज लागणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्पोक्‍टो सोल्यूशन्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समित श्रीवास्तव म्हणाले,""देशातील उद्योग आणि व्यावसायिकांसाठी 2020 हे वर्ष एखाद्या दु:स्वप्नासारखे आहे. बॅंकिंग आणि कर्ज देणाऱ्या इको सिस्टिमला आपली एंगेजमेंट धोरणे आणि योजना नव्याने विकसित कराव्या लागतील.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Commonwealth Para Athletics: तोरणडोंगरीच्या जिल्हा परिषद शाळेतील दिलीप गावितची ग्लास्गो राष्ट्रकुल पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णभरारी

Ambad Vegetable Market: अंबडच्या आठवडी बाजारात पावसाने भाजीपाल्याची मोठी नासाडी; शेतकरी‑विक्रेते बेभाव विक्रीला मजबूर

SCROLL FOR NEXT