पुणे

प्रवास करून आलाय? मग १४ दिवस घरीच राहा!

सकाळवृत्तसेवा

पुणे - दुबईमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग आहे. त्यामुळे तेथून प्रवास करून आल्यानंतर पुढील १४ दिवस घरातच रहा. बाहेर पडू नका. म्हणजेच स्वतःला घरातच विलगिकरण (होम कॉरंटाइन) करून ठेवा, हा सल्ला आरोग्य खात्याकडून वारंवार देण्यात येत आहे. मात्र, तो सल्ला न ऐकल्याने कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढण्याचा धोका असल्याचे मत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून नोंदविले जात आहे. 

सिंहगड रस्त्याच्या परिसरात राहणारे कुटुंबातील नवरा-बायको आणि मुलगी दुबईला सहलीसाठी गेले होते. ते १ तारखेला मुंबई विमानतळावर उतरले. कोरोना बाधित देशांमधून प्रवास करून आल्यानंतर कोणतीही लक्षणे नसली तरीही १४ दिवस घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. त्याचं कारणही असे आहे की, या दरम्यान कोरोनाच्या संसर्गाची लक्षणे दिसल्यास त्याचा इतरांना प्रादुर्भाव होणार नाही. त्यामुळे संसर्गास आळा बसेल. पण, दुबईवरून आल्यानंतर ‘होम कॉरंटाइन’चा सल्ल्याकडे दुर्लक्ष केले.

दुबईला सहलीला गेलेल्या कुटुंबातील एकाला घरी आल्यावर रात्री थंडी वाजू लागली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ते खासगी डॉक्‍टरांकडे गेले. डॉक्‍टरांनीही महापालिकेच्या नायडू रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, तो त्यांनी ऐकला नाही. तापावरच्या गोळ्या घेऊन ते घरी गेले. त्यानंतर थंडी, ताप वाढला. दरम्यान, त्यांनी रक्ताची तपासणी केली. पण, त्यातून कोणतेही निदान झाले नाही. त्यानंतर काही दिवस ताप उतरला. ते दैनंदिन काम करू लागले. पण, ते पाच तारखेला  पुन्हा तापाने फणफणले. त्यामुळे परत ते डॉक्‍टरांकडे गेले. 

त्यावेळी मात्र, डॉक्‍टरांनी औषध दिले नाही. थेट नायडू रुग्णालयात जायला सांगितले. मात्र, ते दुसऱ्या डॉक्‍टरांकडे गेले आणि औषध घेतले. त्यानंतरही बरे वाटले नसल्याने अखेर ८ तारखेला डॉ. नायडू रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर ९ तारखेला रात्री त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान ‘एनआयव्ही’ने केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: मठात परतल्यानंतर फटाके, गर्दी अन् हॉर्नचा सामना... माधुरी पुन्हा वनतारामध्ये जाणार? PETA ची सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Latest Marathi News Live Update : मुंबईत ऑक्टोबर हीटचा तडाखा; पुढील ६० ते ७२ तासांत तापमानात मोठी वाढ

Pune ACB Trap : 'वर्दी'ला पुन्हा कलंक! शिरूरमध्ये 95 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात; गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागत होता 1 लाख

IND vs SL Semi Final : भारताला दिवसा 'चांदण्या' दिसल्या! ९ फलंदाज घेऊन उतरले, पण इशान किशन, वैभव सूर्यवंशीमुळे वाचली लाज

'आपको बाहर जाना पड़ेगा...' मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं? Viral Video

SCROLL FOR NEXT