corona.jpg 
पुणे

कोविडसाठी महापालिका प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची मानधनावर नियुक्ती करणार

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनावरील उपचारांसाठी महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटर मध्ये वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक विद्यालय, नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांची मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासंबंधित प्रस्तावाला मंगळवारी मान्यता देण्यात आली असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोना बाधितांची वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या वतीने उपचारासाठी जंबो कोविड सेंटर्स उभारण्यात येत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर डॉक्‍टर्स, नर्सेस व अन्य कर्मचारी वर्गाची गरज भासणार आहे. महापालिकेने अनुभवी स्टाफ व डॉक्‍टर्स साठी जाहिरातीही दिल्या मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच नर्सिंग कॉलेज मधील अंतिम वर्षाचे विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे.

या विद्यार्थ्यांची सहा महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात येणार असून या कालावधीत त्यांना मानधन दिले जाणार आहे, असेही रासने यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयात "एमबीबीएस' झालेले व प्रशिक्षणाचा कालावधी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांना 30 हजार रुपये तर आयुर्वेदिक महाविद्यालयाकडील बीएएमएस झालेल्या प्रशिक्षणार्थींना 25 हजार मानधन दिले जाणार आहे. बीएचएमएस झालेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना 20 हजार रुपये, तर वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एमबीबीएस विद्यार्थ्यांना दररोज 500 रुपये, नर्सिंगचे प्रशिक्षण आलेल्यांना दररोज 400 रुपये, कोविड केअर सेंटर, वॉर रूम, स्वाब सेंटर, इतर कोविड बाबत काम करणाऱ्या स्वयंसेवकांना प्रतिदिन 100 रुपये मानधन अदा करण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉर्ड्सच्या बाल्कनीतील तो ऐतिहासिक क्षण पुन्हा जिवंत; सौरव गांगुलीच्या भूमिकेत राजकुमार रावचा दमदार लूक

Kolhapur Flood News : पंचगंगा इशारा पातळीपासून अडीच फूट दूर, राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी; जिल्ह्यातील धरणात इतका पाणीसाठा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक सुरळीत

Washim: केनवड–कोयाळी रस्त्यावर मृत्यूचे सापळे; तारा लोंबकळल्या, रस्ते खचले; प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र गप्प

Pune Rain Update: पुण्यात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग; जंगली महाराज रोडवर जुने वृक्ष कोसळले, वाहतूक कोंडीची शक्यता

SCROLL FOR NEXT