Corporator try take Scepter at Pimpri Chinchwad Municipal Corporation.jpg 
पुणे

Video : ...म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेत राजदंड पळविण्याचा केला प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : खासगी वाटाघाटीने भूसंपादन करण्याचा विषय तहकूब केल्याने महापालिका सर्व साधारण सभेत शिवसेना, राष्ट्रवादी नगरसेवकांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. सभा तहकूब करून महापौर उषा ढोरे निघून गेल्यानंतर ही सभा गृहात गोंधळ सुरुच होता.
 

खासगी वाटाघाटी करून भू-संपादन करताना संबंधित जमीन मालकास मोबदला देण्याचा विषय सर्व साधारण सभेपुढे होता. याबाबतचा ठराव २१ नोव्हेंबर २०१३ ला सर्व साधारण सभेने केला आहे. त्यानुसार जमीन मालकास नुकसान भरपाई देताना ३० टक्के दिलासा रक्कम मिळणार आहे. मात्र, २० नोव्हेंबर २०१५ च्या ठरवानुसार ३०० चौरस मीटर बाधितांना १०० टक्के दिलासा रक्कम व त्यापेक्षा अधिक क्षेत्र असल्यास ३० टक्के रक्कम देण्यास मान्यता आहे. तसेच, ३०० पेक्षा अधिक क्षेत्राचे विभाजन करून कमी क्षेत्राचा भूखंड करून सर्व प्रकरणात ३० टक्केच सांत्वन रक्कम देण्याचा विषय मान्यतेसाठी होता. तो तहकूब केल्याचे महापौर उषा ढोरे यांनी जाहीर केले.
खेड-शिवापूर टोलनाक्याबाबत 'हा' मॅसेज होतोय व्हायरल 

त्यानंतर शिवसेना गट नेते राहुल कलाटे यांनी राज दंड पळविण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी राज दंड घेतला. कलाटे यांना राष्ट्रवादी नगरसेवकांची साथ मिळाली व गोंधळ वाढला. त्यातच सभा तहकूब केल्याचे सांगून महापौर ढोरे निघून गेल्या. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT