Cycle Track Sakal
पुणे

वाहतूकीत अडथळा ठरत असलेला सायकल ट्रॅक नगरसेवकाने उखडला

वाहतुकीला अडथळा ठरत असलेला येथील उड्डाणपूलाजवळील सुमारे दोनशे मीटर लांबीचा सायकल ट्रॅक एका नगरसेवकाने जेसीबी यंत्राच्या साह्याने उखडून टाकला.

कृष्णकांत कोबल

हडपसर - वाहतुकीला अडथळा ठरत असलेला येथील उड्डाणपूलाजवळील सुमारे दोनशे मीटर लांबीचा सायकल ट्रॅक एका नगरसेवकाने जेसीबी यंत्राच्या साह्याने उखडून टाकला आहे. अनेक वेळा निवेदने देऊनही अडचणीचा ठरत असलेला हा ट्रॅक पालिकेकडून काढला जात नसल्याने ही कृती करावी लागल्याचे या नगरसेवकाने सांगितले.

हडपसर येथील पुणे सोलापूर मार्गावरील उड्डाणपूलाच्या सुरवातीला व कामधेनू सोसायटी समोर सायकल ट्रॅक होता. मात्र, हा ट्रॅक केवळ वाहने उभी करण्यासाठी वापरला जात होता. ट्रॅकमुळे मुख्य रस्ता अरूंद झाला होता.

सोलापूरकडे जाताना पूलावर व पूलाच्या बाजूने जाणाऱ्या वाहनांचा गोंधळ उडत असे. नगरसेवक योगेश ससाणे यांनी याबाबत वारंवार निवेदने देवून प्रशासनाकडे हा ट्रॅक काढून रस्ता रूंद करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज जेसीबी लावून हा संपूर्ण ट्रॅक उखडून टाकला आहे. नागरिकांची व प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन ही कृती केली असल्याचे त्यांनी सांगितले. रविवार असल्याने पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT