Corruption in government system 
पुणे

सरकारी यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरली 

अनिल सावळे

पुणे - पोलिस, महसूल आणि जिल्हा परिषदेसह बहुतांश सर्वच सरकारी विभागांना सध्या लाचखोरीने पोखरले आहे. लाच घेतल्याशिवाय कामेच होत नसून दोन-चार सरकारी कार्यालयांचा अपवाद वगळता अन्य कोणता विभाग धुतल्या तांदळासारखा साफ नाही, ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने गेल्या 11 महिन्यांत घातलेल्या छाप्यांवरून स्पष्ट झाली आहे. 

पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांत 158 लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यात पोलिसांचा आकडा सर्वाधिक असून, या खात्यातील 45 जणांवर चिरीमिरी घेतल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ महसूल विभागातील 37 अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. लाचखोरीत जिल्हा परिषद तिसऱ्या आणि महापालिका चौथ्या स्थानावर आहे. 

"एसीबी'चे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक सुषमा चव्हाण, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक संजय पाटील, पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लाचखोरांवर धडक कारवाई सुरू केली आहे. केवळ चारच विभागात नव्हे, तर जमीन मोजणी, शिक्षण, सिंचन, विधी व न्याय विभाग, आरटीओ, सहकार, ग्रामविकास, महावितरण, दस्त नोंदणी, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती, पशुपालन, जीएसटी, अन्न व औषध प्रशासन, कामगार आयुक्‍त कार्यालय, वन विभाग, अपंग कल्याण महामंडळ, खादी ग्रामोद्योग, ऊर्जा, महिला व बालकल्याण, क्रीडा आणि वजन मापे कार्यालयातील प्रत्येकी एक-दोन कर्मचाऱ्यांवर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. पोलिस, महसूल, जिल्हा परिषद, महापालिका, महावितरण, शिक्षण, सिंचन विभागात लाचखोरीचे प्रमाण वाढल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. 

- पुणे जिल्ह्यात 58 जणांवर कारवाई, उर्वरित शंभर जण अन्य चार जिल्ह्यांमधील 
- पुणे जिल्ह्यात पोलिस खात्यातील 24 जणांवर, तर महसूल विभागातील सात जणांवर कारवाई 

महसूल विभागातील कारवाई (वर्ष 2019) 
जानेवारी : भूगाव येथे तलाठी आणि कोतवाल सातबारा नोंदीसाठी 50 हजारांची लाच घेताना गजाआड 
जुलै : आंबेगावच्या तत्कालीन तहसीलदार आणि लिपिकाला शेततळ्याच्या मंजुरीसाठी एक लाखाची लाच घेताना पकडले. 
सप्टेंबर : गोळेगाव (ता. जुन्नर) येथे सातबारावर नोंद करण्यासाठी सहा हजारांची लाच घेताना तलाठी ताब्यात 
सप्टेंबर : पिंपरी-चिंचवड येथील नायब तहसीलदार ऐपत दाखल्यासाठी 7 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई 
नोव्हेंबर : सूस गाव येथे जमिनीची सातबारावर नोंद करण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना तलाठी गजाआड 
नोव्हेंबर : वडगाव खुर्द तलाठी कार्यालय-सातबारावर नोंदीसाठी 15 हजारांची लाच घेताना खासगी व्यक्‍ती ताब्यात 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT