पुणे

लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकाऱ्यावर गुन्हा

CD

पौड, ता. १२ : खरेदी केलेल्या जमिनीचा सातबारा आणि फेरफार उताऱ्यात नोंद करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी घोटावडे (ता. मुळशी) येथील महिला मंडल अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रोहिणी शशांक गुप्ते (वय ५७, रा. सदाशिव पेठ, पुणे) असे लाच मागितलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदारांनी केमसेवाडी येथे जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीचा सातबारा उतारा आणि फेरफार उताऱ्यावर नोंद करण्यासंदर्भात तक्रारदाराने तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. त्यावेळी या नोंदीसाठी मंडल अधिकारी गुप्ते यांनी तक्रारदाराकडे मोबाईलवरून स्वतःसाठी आणि तलाठ्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.
याबाबत तक्रारदाराने २४ जुलैला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी २८ जुलैला सापळा रचून पडताळणी करण्यात आली. त्यावेळी अधिकारी रोहिणी गुप्ते यांनी पंचांसमक्ष स्वतःसाठी पाच हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले. या पडताळणीनंतर १२ नोव्हेंबरला पौड पोलीस ठाण्यात गुप्ते यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhosari Purandar Airport : भोसरीतून थेट पुरंदर विमानतळापर्यंत भुयारी मार्गाची योजना; ‘पाताळ लोक’ प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने उचलले पुढचे पाऊल

Kimberly Powell: कोण आहेत एनव्हिडियाच्या सीईओची 'विकेट' घेणाऱ्या किंबर्ली पॉवेल? इंटर्न ते थेट कंपनीच्या उपाध्यक्षा

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

Khopoli Bus Accident : बाजारपेठेत अर्धा किलोमीटर मृत्यूचा थरार! अनियंत्रित बसने अनेक वाहनांना उडवले; एका तरुणाचा करुण अंत!

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT