पुणे

वेतनावरील खर्च ५१ टक्‍क्‍यांवर

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘‘पीएमपीच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत २० कोटी रुपयांची वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तोटा पाच कोटी रुपयांनी कमी झाला आहे. मात्र, पीएमपीचा वेतनावरील खर्च ५१ टक्‍क्‍यांवर पोचला आहे,’’ अशी माहिती पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली.

पीएमपीच्या २०१६-१७ आर्थिक ताळेबंदाला संचालक मंडळाने मंजुरी दिली. त्यानंतर शिरोळे म्हणाले, ‘‘गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत सरत्या वर्षातील तोटा सुमारे पाच कोटी रुपयांनी कमी झाला आहे. तसेच, मार्गावरील बसची संख्या प्रतिदिन १३८३ वरून १४२५ वर पोचली आहे, तर प्रवासी संख्या दहा हजारांनी वाढली असून, ती आता १० लाख ८९ हजार झाली आहे.’’ पीएमपी बसची संख्या जास्त असली, तरी तुलनेत खासगी कंत्राटदारांच्या नादुरुस्त होणाऱ्या बसचे प्रमाण जास्त असून ते वाढते आहे. त्याबाबत उपाययोजना सुरू आहेत. या प्रसंगी पीएमपीचे महाव्यवस्थापक विलास बांदल, वाहतूक विभागाचे प्रमुख दिलीप माने, मुख्य लेखापाल योगेश हुले आदी उपस्थित होते.

शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये बीआरटी संगमवाडी- विश्रांतवाडी, सांगवी- किवळे, नाशिकफाटा- वाकड, येरवडा- वाघोली, दापोडी- निगडी हे कॉरिडॉर सुरू आहेत. सातारा रस्त्यावरील काम दोन महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर तेथे बीआरटी सुरू करण्याबाबत महापालिकेशी बैठक घेऊन नियोजन करण्यात येणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.  

पाच भाडेकरूंच्या मिळकती सील
भाडे थकविल्याबद्दल सूरज साळुंके (स्वारगेट संकुल) आणि राहुल मधुकर सैदाणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअर्स, गोल्डन कारगो कॅरिअर, मोटे शिक्षण संस्था (हडपसर संकुल) यांच्या मिळकती पीएमपी प्रशासनाने सील केल्या आहेत. त्यांच्याकडे एकूण सुमारे ३ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासूनच्या थकबाकीबद्दल ही कारवाई केली आहे. 

२०१२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या 
चालक ६६५, वाहक ३१०, वर्कशॉप ४९७, प्रशासनांतर्गत ५४० अशा एकूण २०१२ कर्मचाऱ्यांच्या प्रशासनाने बदल्या केल्या आहेत. 

कर्मचाऱ्यांना घराजवळ नियुक्ती देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. त्याअंतर्गत या बदल्या झाल्या आहेत. पुढील काळातही ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला! ज्याच्यामुळे मागची मॅच हरली, त्याला केले संघाबाहेर; बघा कशी आहे Playing XI

Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले

Nagpur Crime : ‘एआय’ तंत्रज्ञानाने शोधला निर्घृण मारेकरी; वृद्धेवरील अत्याचार व खुनाचा झाला उलगडा

SCROLL FOR NEXT