पुणे

Video : सुती पिशव्या, पर्सनिर्मितीमध्ये उत्तुंग भरारी

नीला शर्मा

टेक्‍सटाइलबाबतचं शिक्षण घेतलेल्या मानिनीताईनीं सुती कापडाचं पारंपरिक महत्त्व, त्याची उपयोगिता आणि वैविध्यपूर्णतेची ताकद हेरून नित्य वापरातील पिशव्या, पाउच आदींसाठी ते नव्या जोमाने रुजवायचं ठरवलं. कल्पकता, कष्ट आणि प्रामाणिक व्यवहार आदींच्या बळावर त्यांनी या व्यवसायाचं यशस्वी लघुउद्योगात रूपांतर केलं. आज काही महिला त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष निर्मितीत सहभागी आहेत. तर अनेक जणी ही उत्पादनं नेऊन विकून नफा कमवत आहेत.

मानिनीताई म्हणाल्या, ‘‘लहान-मोठा आकार व प्रकारांतील पिशव्या, पर्स, पाउच, स्लिंग बॅग, पिलो कव्हर, टिफिन बॅग, फाइल फोल्डर, कॉइन पाउच वगैरे सुमारे पंचेचाळीस उत्पादनं आम्ही तयार करतो. दैनंदिन वापरासाठी सहज बाळगता येतील व मळल्यास धुऊन वापरता येतील, अशी उत्पादनं असल्यानं ती लोकांच्या पसंतीस उतरत गेली. कुठलंही उत्पादन आमच्याकडे फार काळ शिल्लक राहत नाही. नवी बॅच तयार करताना नवनव्या डिझाइन्सची कापडं आम्ही आवर्जून वापरतो. भरतकाम, हातानं केलेली पेंटिंग्ज, खिशांचे सौंदर्यपूर्ण प्रकार वगैरेमुळे आमची उत्पादनं ग्राहकांना वारंवार आमच्याकडे आकर्षित करतात.’’

मानिनीताईंनी स्पष्ट केलं, की या सगळ्याची सुरुवात अगदीच वेगळ्या उत्पादनापासून झाली. नवऱ्यासाठी दुचाकीवरून जाताना घालण्यासाठी जाकिट तयार केलं, ते मात्र टेरिकॉटचं आणि आतून अस्तर लावलेलं. पण कमी वजन आणि छोटीशी घडी करून प्रसंगी हेल्मेटमध्ये मावू शकणारं, प्रदूषणापासून वाचवणारं, उन्हाळ्यात उकाडा व हिवाळ्यात थंडीचा त्रास न जाणवू देणारं ते जाकिट पाहून परिचितांनी मागणी नोंदवली.

आधी घरातच पाचशे नग तयार केले. मग छोटेखानी प्रदर्शनांतून कुटुंबीयांच्या मदतीने त्याचा व्यवसाय वाढत गेला. अमुक प्रकारे पिशवी, पाउच करून पाहूया, असं करता करता सतत भर पडत गेली. मदतनीसांची संख्या वाढत गेली. रास्ता पेठेतील अत्रे सभागृहालगतच्या गल्लीत आम्ही राहतो. त्या इमारतीतच आमचा शिवण कारखाना आणि बाजूला आउटहाउसमध्ये विक्री केंद्र आहे. अनेक जणींना यात सामील करून घेऊन रोजगार पुरवू शकले, याचं समाधान आहे. चित्रपटगीत, भावगीत आदींचे कार्यक्रम आणि ओल्या कचऱ्याच्या खतापासून आमच्या गच्चीवर फोफावलेली बाग हे माझे खास आवडीचे विषय मला विरंगुळा पुरवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT