आळेफाटा, ता. २० : आळेफाटा परिसरात कापूस पिकाला सध्या फुलोरा येण्यास सुरुवात झाली आहे. पिकाची वाढ समाधानकारक दिसत आहे. मात्र, फुलोऱ्याच्या अवस्थेत पिकाला पाण्याची गरज असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे.
आळे, वडगाव आनंद, राजुरी, पिंपळवंडी, बोरी बुद्रुक, आणे, शिंदेवाडी परिसरात यंदा शेतकऱ्यांनी कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसामुळे कापूस पिकाला पोषक वातावरण मिळाले. त्यामुळे पिकाची वाढ चांगली झाली असून, आता अनेक शेतांमध्ये कापसाच्या झाडांना फुले व पात्या लागण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या कापूस पीक फुलोऱ्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहे. या काळात पुरेसा ओलावा मिळाल्यास पिकाची वाढ जोमाने होऊन उत्पादनाला फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीतील ओलावा कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
पावसाने आणखी काही दिवस दडी मारल्यास कापूस पिकाच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरात दमदार पावसाची आवश्यकता असून, आगामी काळात पाऊस झाल्यास कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
फूलगळ, पातगळ होण्याची शक्यता
कापूस पिकाला फुलोरा व पात्या लागण्याच्या काळात जमिनीत पुरेसा ओलावा असणे महत्त्वाचे असते. या काळात पाण्याचा ताण आल्यास फूलगळ व पातगळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे सध्या पावसाकडे लक्ष लागले आहे.
08797
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.