पुणे

पूर्वहंगामी कापूस पिकात आंतरमशागत, खते देण्यास खानदेशात वेग

CD

पूर्वहंगामी कापसात आंतरमशागत, खत व्यवस्थापनाला वेग
--
तणनियंत्रणासाठी तणनाशकांचा वाढता वापर; युरियाची टंचाई कायम

ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : खानदेशात मेअखेर व जूनच्या सुरुवातीला लागवड झालेल्या पूर्वहंगामी (बागायती) कापसाची वाढ समाधानकारक होत आहे. मात्र अनेक भागांत तणांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी आंतरमशागत आणि तणनियंत्रणाच्या कामांना वेग दिला आहे. मजूरटंचाईमुळे अनेक शेतकरी तणनाशकांचा वापर करून तणनियंत्रण करत आहेत.

पावसापूर्वी आंतरमशागत पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला. अनेकांनी दोन फेऱ्यांची आंतरमशागत पूर्ण केली असून, पहिला रासायनिक खतांचा डोसही दिला आहे.

खानदेशात सुमारे सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली आहे. हलक्या आणि अधिक पाणी वापराच्या जमिनीत तणांचे प्रमाण वाढले आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत तणनियंत्रणासाठी मजूरटंचाई जाणवत आहे. काही गावांत तण काढणीसाठी मजुरांनी प्रतिदिन दोन हजार रुपयांपर्यंत मजुरीची मागणी केल्याने अनेक शेतकऱ्यांनी तणनाशकांचा पर्याय स्वीकारला आहे.

कापसाखालील क्षेत्र मोठे आणि उपलब्ध मजूर कमी असल्याने तणनाशकांचा वापर वाढत आहे. तणनियंत्रणासाठी प्रतिएकर सुमारे १,२०० रुपये खर्च येत आहे. काही कंपन्यांनी १५ दिवसांपासून एक महिन्यापर्यंतच्या कापूस पिकासाठी, तसेच दीड महिन्याच्या पिकासाठी प्रतिएकर ४०० ते ५०० रुपये खर्चाची तणनाशके बाजारात उपलब्ध केली आहेत. खर्च परवडणारा आणि परिणामकारक असल्याने शेतकरी त्यांचा वापर करत आहेत.

युरियाची टंचाई कायम

हंगामात खतांचा वापर सुरू होत असतानाच युरियाची टंचाई जाणवत आहे. कृषी विभागाकडून कमी प्रमाणात आणि गरजेनुसारच युरियाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अधिक युरिया वापरल्यास कापसात फुले व पातेगळ होण्याचा धोका वाढत असल्याने शेतकरीही संयमाने वापर करत आहेत. पहिला खतांचा डोस पूर्ण झाला असून, पीक सुमारे ६० दिवसांचे झाल्यानंतर दुसरा बेसल डोस देण्याचे नियोजन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ए. आर. रहमान यांच्या मुलाचा अपघात; पहाटे 3 वाजता Porsche ची धडक

Marathi News Live Updates : जंतरमंतरवरील लाठीचार्जवर गृहमंत्री अमित शहा लोकसभेत निवदेन देण्यास तयार

Blocked Nose: सर्दी नाही तरी रात्रीच्या वेळी नाक का बंद होते? जाणून घ्या कारण आणि सोपे उपाय!

Mumbai Train Disturb: मुलुंड स्टेशनमध्ये ट्रेनवर काहीतरी पडले; आग लागली.. धुरांचे लोट अन् मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत Video

Bhudargad Fort Wall Collapse : अवघ्या 2 वर्षांत ऐतिहासिक भुदरगड किल्ल्याची 50 फूट लांबीची तटबंदी कोसळली; कोट्यवधींचा निधी पाण्यात, गडप्रेमींचा तीव्र संताप

SCROLL FOR NEXT