Crime 
पुणे

क्रिकेट खेळण्यास मज्जाव केल्याने दाम्पत्यासह मुलाला जबर मारहाण; 9 जणांविरोधात गुन्हा

सकाळवृत्तसेवा

पुणे - घरासमोर क्रिकेट खेळण्यास मज्जाव केल्याच्या रागातून दाम्पत्यासह त्यांच्या मुलाला टोळक्‍याने जबर मारहाण केली. तसेच खुनाचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सकाळी अकरा वाजता रामटेकडी येथे घडली होती. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून एकास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी परशुराम यलप्पा मिरेकर (वय 72, रा. रामटेकडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर चार अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबरोबरच काजल सुरेश मिरेकर (वय 31), सुरेश परशुराम मिरेकर (वय 38), अदिनाथ संजय मिरेकर (वय 19, तिघेही रा. रामटेकडी) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुष्पा ठाकुर (वय 40, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रामटेकडी येथील घर व सुनील सायकल मार्टच्या शेजारी काही मुले क्रिकेट खेळत होते. त्यावेळी फिर्यादीचे पती दिपक यांनी संबंधीत मुलांना तुम्ही येथे क्रिकेट खेळू नका असे सांगितले. त्याचा राग मनात धरून आरोपींनी आरडा ओरडा करत फिर्यादी व त्यांच्या पतीला शिवीगाळ करीत धमकाविण्यास सुरूवात केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी, त्यांचे पती व मुलास लाथाबुक्‍क्‍यांनी, बॅट, स्टंप व दगड विटांनी मारहाण करीत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. या घटनेत फिर्यादीची सोन्याची रिंग गहाळ झाली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे करीत आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Lek Ladki Scheme : ‘लाडक्या लेकीं ’च्या पैशांवरही डल्ला! बीडमधील प्रकार, अधिकारी म्हणतात ३५९ मुलींच्या नावे दुबार निधी गेला

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

Free Registration of 50 Lakh Rural Properties: पंतप्रधानांच्या वाढदिवशी 'स्वामित्व योजने'ने गावकऱ्यांना दिला मालकी हक्क! ५० लाख ग्रामीण संपत्तींची मोफत रजिस्ट्री

SCROLL FOR NEXT