A couple did 4 lakh fraud with young boy by selling JcB Machine 
पुणे

जेसीबी यंत्र विक्रीच्या बहाण्याने दाम्पत्याकडून तरुणाची फसवणूक

सकाळवृत्तसेवा

पुणे : जेसीबी यंत्र विक्री करण्याच्या बहाणा करुन दाम्पत्याने एका तरुणाला तब्बल चार लाख रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी दोघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

- बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍपतुकाराम उर्फ बापू खांडेकर व पूनम तुकाराम खांडेकर दोघेही (रा. मेरुधर सोसायटी, कात्रज-कोंढवा रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अजय राजाराम सपकाळ (वय 43, रा. चांढवे, महाड, रायगड) यांनी फिर्याद दिली. ही घटना 2018 ते 2020 या कालावधीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सपकाळ हे मूळचे रायगड जिल्ह्यातील चांढवे गावचे रहिवाशी आहेत. त्यांना व्यवसायासाठी जेसीबी यंत्र खरेदी करायचे होते. त्यानुसार त्यांनी ओएलएक्‍स बेवसाईटवरुन माहिती घेऊन तुकाराम खांडेकर याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर खांडेकरने सपकाळ यांना व्यवहारासाठी कात्रज -कोंढवा रस्त्यावरील रॉयल ऍटो फायनान्स कार्यालयात बोलाविले. तेथे त्यांच्यात जेसीबी खरेदीचा व्यवहार 15 लाख रुपयांना ठरला. त्यावेळी खांडेकर याची पत्नीही उपस्थित होती. त्यानुसार सपकाळ यांनी खांडेकर यास 50 हजार रुपये रोख दिले. त्यानंतर साडे तीन लाख रुपये बँकेतून आरटीजीएसद्वारे खांडेकरच्या बँक खात्यात वर्ग केले. आगाऊ रक्कम दिल्यानंतर सपकाळ यांनी त्यांच्याकडे जेसीबी यंत्राची मागणी केली. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सपकाळ यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एस. चव्हाण करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT