पुणे

लोणावळ्याजवळ युवक-युवतीचा खून

भाऊ म्हाळस्कर

लोणावळा : लोणावळा-अँबी व्हॅल्ली रस्त्यावर सिंहगड महाविद्यालयातील युवक-युवतीचा खून करण्यात आला. लोणावळ्याजवळील आयएनएस एस कॉर्नरजवळील निर्जनस्थळी सोमवारी दुपारी दोन्ही मृतदेह आढळले.


सार्थक दिलीप वाकचौरे (वय 22, रा. राहुरी, अहमदनगर) व श्रुती संजय डुंबरे (वय 21, रा. ओतूर, जुन्नर) असे खून झालेल्या महाविद्यालयीन युवक-युवतीचे नाव आहे. ते दोघेही लोणावळ्याजवळील कुसगाव बुद्रुक येथील सिंहगड महाविद्यालयात शिक्षण घेत होते. सार्थक मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात; तर श्रुती संगणक शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती.


लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक व श्रुती हे चांगले मित्र होते. श्रुती महाविद्यालयातील वसतिगृहात; तर सार्थक भाड्याने खोली घेऊन बाहेर राहत होता. ते दोघेही रविवारी सायंकाळपासून बेपत्ता होते. घटनास्थळी सार्थकची मोटारसायकल (एमएच 17 एयू 5150) आढळून आली. सोमवारी दुपारी अडीच ते तीनदरम्यान सरपण गोळा करणाऱ्या एका व्यक्तीला युवक-युवतीचे मृतदेह आढळले. त्याने घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनील इंगुळकर यांना दिली. इंगुळकर यांनी या घटनेची माहिती लोणावळा शहर पोलिसांना दिली. दोघांच्या डोक्‍यात दगड व कठीण वस्तूने प्रहार केले आहेत. मृतदेह विवस्रवस्थेत असून, मुलीचे तोंड व हात कपड्यांनी बांधलेले होते. घटनेची माहिती समजताच पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक एम. सुवेझ हक, अतिरिक्त अधीक्षक राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी डी. डी. शिवथरे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.


दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने लोणावळा परिसर हादरला असून, महाविद्यालयात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच दोघांच्या मित्रांनी घटनास्थळी व लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिस सर्व शक्‍यता पडताळून पाहत आहेत. घटनेविषयी सार्थक व श्रुतीच्या मित्रांचे जाबजबाब नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT