पुणे

कोरेगाव भीमात चोरीचा प्रयत्न फसला

CD

कोरेगाव भीमा, ता. ११ : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील एका कुरिअर कंपनीचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे फसला. पोलिसांना दूरध्वनी केल्याचे लक्षात येताच चोरटे आपली रिक्षा घटनास्थळीच सोडून पसार झाले. सोमवारी (ता. १०) सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
येथील बालाजी कॉम्प्लेक्समधील ‘सँडोफॅक्स टेक्नॉलॉजी लि.’ या कुरिअर कंपनीत सोमवारी पहाटे ६.५७ वाजता तीन अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून प्रवेश केला. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून रोकड असलेले लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कंपनीचे डिलिव्हरी बॉय अजय गोंडे कामावर आले असता त्यांना शटर उचकटलेले दिसले. त्यांनी तातडीने पोलिसांना दूरध्वनी लावला.
गोंडे पोलिसांशी बोलत असल्याचे पाहून चोरट्यांनी तेथून पळ काढला, तर रिक्षाचालक आपली रिक्षा (क्र. एम.एच.१२ क्यू.ई.५९४८) सोडून पळाला. या घटनेत कंपनीतील रोकड आणि पार्सल सुरक्षित राहिल्याने मोठी हानी टळली. व्यवस्थापक महेश भोसले (वय ३२, रा. वाघोली) यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेल्या रिक्षाच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

Gangapur News : १ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आणि जामिनाच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ; चिमुकलीचा ताबा घेत विवाहितेला घरातून हाकलले

Ausa News : ओमराजेंबाबत आदित्य ठाकरेंचा ‘सॉफ्ट कॉर्नर’? बंडखोरी केलेल्या खासदारावर थेट बोलणे टाळले; ‘यायला हवे होते’ एवढेच उत्तर

SCROLL FOR NEXT