एकनाथ घोगरे यांची फेटाळल्याने
विखेंचा बॅंकेवरील मार्ग मोकळा
अहिल्यानगर, ता. २२ : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी एकनाथ घोगरे यांची याचिका छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे. राहाता सेवा संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेच्या संचालकपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहाता सेवा संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारीवर विरोधी उमेदवार एकनाथ घोगरे यांनी हरकत घेतली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी ही हरकत फेटाळून लावली. या निर्णयाविरोधात घोगरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती मंजूषा अजय देशपांडे यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने घोगरे यांची याचिका फेटाळली. त्यामुळे डॉ. विखे पाटील यांच्या उमेदवारीला न्यायालयात दिलेले आव्हान निष्प्रभ ठरले.
डॉ. विखे पाटील यांच्या वतीने ॲड. विनायक होन आणि ॲड. अभय ओस्तवाल यांनी बाजू मांडली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ॲड. सुभाष तांबे, तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने ॲड. साहेबराव कदम यांनी काम पाहिले.
-----
चौकट
...
राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्व
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे. राहाता सेवा संस्था मतदारसंघातून डॉ. विखे पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने जिल्हा बँकेच्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही या घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.