पुणे

गर्भवती महिलेवरील हल्ल्याचे प्रकरण :

CD

न्यायालयाकडून तिन्ही गुन्हे रद्द
गर्भवतीवरील हल्ल्याप्रकरणी परस्पर सामंजस्याने तडजोड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : उद्‍वहनामध्ये (लिफ्ट) गर्भवतीला लाथ मारल्यामुळे तिचा गर्भपात झाल्याच्या आरोपप्रकरणी दाखल तीन गुन्हे उच्च न्यायालयाने नुकतेच रद्द केले. यामध्ये एक गुन्हा हा मुंबईतील एका विकसकाचा मुलगा आणि होणाऱ्या जावयाविरोधात केला होता. न्यायालयाने त्यांची कारागृहातून सुटका करण्याचे आदेश या वेळी दिले.
ही घटना रागाच्या भरात घडली होती आणि संबंधित पक्षकारांना हे प्रकरण विसरून जायचे आहे. त्यामुळे या प्रकरणाचा कायमचा निपटारा होण्यासाठी तक्रारदार आणि आरोपींमध्ये परस्पर सामंजस्याने तडजोड झाली आहे. या पार्श्वभूमीवर दाखल तिन्ही गुन्हे रद्द करण्यात येत असल्याचे न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने आदेशात अधोरेखित केले. ही घटना १५ नोव्हेंबर २०२५ मध्ये मध्यरात्री घडली होती. संबंधित महिलेच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या लिफ्ट आरोपी तनय जितेंद्र शहा, त्याची बहीण यशस्वी आणि तिचा होणारा पती रिदम अरविंद गोयल यांनी हल्ला केला होता. या दोघांमुळे एका न जन्मलेल्या बाळाचा मृत्यू झाला होता, असा युक्तिवाद करून सरकारी वकिलांनी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीला विरोध केला, मात्र संबंधित महिलेची इच्छा विचारात घेतल्यानंतर तिच्यावरील हल्ला हा पूर्वियोजित नव्हता आणि कायदेशीर प्रक्रियेमुळे तिला झालेल्या गैरसोयीकडेही एकलपीठाने लक्ष वेधले व कोणत्याही विशेषतः महिला तक्रारदार असलेल्या खटल्यात, फौजदारी खटल्याचे दीर्घकालीन परिणाम क्लेशदायक ठरू शकतात, असे निरीक्षण नोंदवले. तसेच न्यायालयाने गोयल आणि शहा या दोघांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.
प्रकरण काय?
गोयलने महिलेच्या दिशेने लेझर लाइट रोखल्यामुळे सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक वाद झाला, परंतु संबंधित महिलेने लेझर गन हिसकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर गोयलने त्याच गनने तिला मारले. त्यातच गोयल आणि शहा यांनी महिलेच्या पोटावर प्रहार केले आणि तिला जमिनीवर पाडले. लिफ्ट चालकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यालाही शहा आणि गोयलने मारहाण केली. महिलेला तिच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयात नेले. तिथे तपासणीनंतर तिचा गर्भपात झाल्याचे निदान झाले. त्यानंतर १९ नोव्हेंबरला आंबोली पोलिसांनी गोयल आणि शहाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT