पुणे

बारामती न्यायालय परिसरातून आरोपीचा पळण्याचा प्रयत्न

CD

बारामती, ता. ११ : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या न्यायालय परिसरात पोलिसांच्या ताब्यातील आरोपीने पोलिस कर्मचाऱ्याला धक्का देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (ता. १०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार महेंद्र हरिभाऊ लोहार हे आरोपींना न्यायालयात हजर करून परतत असताना परदेशी ऊर्फ ढेप्या सुदाम चव्हाण (वय १९, रा. बोरीवेल, ता. दौंड) याने लोहार यांना पाठीमागून जोराचा धक्का दिला. त्यामुळे लोहार खाली पडून त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने पळ काढला. पोलिस हवालदार विनोद चव्हाण व रणजित धनकम यांनी पाठलाग करून, न्यायालय परिसरातील आकाश घारे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आरोपीला पुन्हा ताब्यात घेतले. याप्रकरणी परदेशीविरुद्ध बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार यशवंत पवार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून टीका; मनोज जरांगे पाटलांनी कराडच्या सभेत दिलं थेट उत्तर, म्हणाले...

Alephata Crime : मानसिक छळामुळे तरुणीने संपविले जीवन; शिक्षकावर गुन्हा दाखल

समृद्धीवर १२०च्या स्पीडने गाड्या धावतात, नो पार्किंगमध्ये कंटेनर लावला, गंभीर अपघाताची शक्यता; त्या चालकावर गुन्हा दाखल, आरटीओकडून कारवाई

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर अपघात; एन्डेवर चालक व दूचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

Viral Video : 'या' शहराच्या मातीत विखुरलय सोनं, लोक वेचून कमवाताहेत लाखो रुपये; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT