पुणे

'डीएसके' प्रकरणाबाबत न्यायालयाने दिले नवीन आदेश

सकाळवृत्तसेवा

पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरोधात सुरू असलेल्या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे अधिकार सध्या सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयाला नाही. त्यामुळे प्रकरण दुस-या न्यायालयात चालविण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. याच न्यायालयास सुनावणी घेण्याचा अधिकार आहे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

संबंधित अर्ज गुंतवणुकदारांच्यावतीने ऍड. चंद्रकांत बिडकर यांनी केला होता. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी हा आदेश दिला. न्यायाधीश राजे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या न्यायालयास सुनावणी घेण्याची अधिकार नाही आणि सहा महिन्यांत निकाल द्यावा, अशा मागण्या करणा-या अर्ज ऍड. बिडकर यांनी केला होता. हे दोन्ही अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत.

राज्य शासनाने जारी केलेल्या नियमानुसार छाननी करून हे प्रकरण चालवले जात आहे. त्याची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्याची रोज सुनावणी घेणे अवघड आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे सध्या केवळ महत्त्वाच्या खटल्यांवर सुनावणी घेण्यात येत आहे. या प्रकरणात पक्षकारांनी दाखल केलेल्या अर्जांची संख्या मोठी आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता सहा महिन्याच्या आत खटल्याचा निकाल लागणे शक्‍य नाही, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद आहे. पुरावे सादर होऊन प्रकरण अंतिम सुनावणीसाठी असताना ऍड. बिडकर त्यात विशेष सरकारी वकिलांनी मदत करू शकता. त्यांचे काही म्हणणे असेल तर त्यांनी ते त्यावेळी लेखी स्वरूपात सादर करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

SCROLL FOR NEXT