पुणे

छळ करणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या उच्चशिक्षित पतीला व त्याच्या घरच्यांना न्यायालयाने दणका दिला. पत्नीला पोटगी व घरभाडे म्हणून प्रत्येकी १० हजार रुपये देण्याचा अंतरिम आदेश न्यायालयाने दिला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पठाण यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. 

पत्नीने पती, सासू, जाऊ आणि दोन दीर यांच्याविरोधात ॲड. चेतना फटाले-कुडाळकर यांच्यामार्फत महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत न्यायालयात धाव घेतली होती. रेश्‍मा व हितेश यांचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. हैदराबाद येथे नांदण्यासाठी गेल्यानंतर काही दिवसांतच सासरच्यांनी त्यांना त्रास देणे सुरू केले. वर्षभरातच त्यांना हैदराबाद येथील घरातून हाकलून देण्यात आले. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पुन्हा नांदण्यासाठी गेल्यानंतर पती हा शारीरीकदृष्ट्या सक्षम नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर हितेशने घरच्यांसोबत रेश्‍माच्या माहेरी येऊन त्यांना व घरच्यांना मारहाण केली. याबाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रारही करण्यात आली होती. न्यायालयात तक्रार दाखल करून, त्याच्या शारीरिक अक्षमतेबद्दल सांगण्यात आले, तेव्हा त्याने न्यायालयात उपस्थित राहून हा मुद्दा खोडून काढला नसल्याचे ॲड. फटाले-कुडाळकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले; तसेच अंतरिम पोटगी देण्याची मागणी केली. तक्रार दाखल झाल्याच्या तारखेपासून रेश्‍मा यांना १० हजार रुपये पोटगी आणि १० हजार घरभाडे देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samarjitsinh Ghatge BJP : समरजितसिंह घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश, पहिलीच प्रतिक्रिया हसन मुश्रीफांवर; "आमच्यात वैर..."

War Ceasefire Impact: युद्ध थांबलं, आता महागाईवर ब्रेक लागणार? मजबूत रुपयामुळे तुमच्या खिशाला कसा फायदा!

MPSC Success Story: वडिलांच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून गाठले यशाचे शिखर; विक्रम पाडळेची कर सहाय्यकपदी निवड, अंत्यविधी दिवशीच एमपीएससीची परीक्षा!

कंत्राटदारांच्या बिलांना मंजुरीसाठी ७ टक्के कमिशनची मागणी, लाच घेताना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अटक

डोक्यावर टक्कल,भेदक डोळे ! वाढदिवसाला सुपरस्टार अल्लू अर्जुनची चाहत्यांना खास भेट; ॲटली सोबतच्या बिग बजेट सिनेमाचा पहिला लूक रिलीज

SCROLL FOR NEXT