पुणे

न्यायालयीन कामकाज लवकरच होणार नियमितपणे सुरू...

सनील गाडेकर

पुणे : गेल्या नऊ महिन्यांपासून महत्त्वाच्या आणि तत्काळ प्रकरणांसाठी एका शिफ्टमध्ये सुरू असलेले जिल्हा न्यायालयाचे कामकाज आता सर्व प्रकरणांसाठी नियमित सुरू होण्याची चिन्हे आहेत. पूर्ण क्षमतेने न्यायालयीन काम सुरू करण्याबाबत आज उच्च न्यायालय आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाच्या पदाधिका-यांची बैठक मुंबईत पार पडली. त्यात झालेल्या निर्णयानुसार येत्या सोमवारपासून (ता.11) नियमित कामकाज सुरू होण्याची शक्‍यता आहे.

कोरोनाचा प्रसार वाढल्यापासून न्यायालयात केवळ महत्त्वाच्या प्रकरणांवरच सुनावणी होत आहे. ऑक्‍टोबरमध्ये लॉकडाऊनचे अनेक नियम शिथिल करण्यात आल्यानंतर न्यायालये पूर्ववत सुरू होतील, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र तेव्हा ते सुरू झाले नाहीत. तेव्हापासून नियमित सुनावणीबाबत तारीख पे तारीख सुरू आहे. आता मात्र याबाबत पुढील दोन ते तीन दिवसांत अंतिम निर्णय होऊन कामकाजाची कार्यपद्धती असलेली एसओपी जाहीर होऊ शकते.

मुंबईत झालेल्या बैठकीस उच्च न्यायालयातील न्यायाधीश, पदाधिकारी, बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ऍड. सुदीप पासबोला, माजी अध्यक्ष ऍड. सुभाष घाडगे, ऍड. विठ्ठल कोंडे-देशमुख सदस्य ऍड. राजेंद्र उमाप, ऍड. उदय वाळुंजीकर आणि मुंबई बार असोसिएशनचे अध्यक्ष व सचिव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

ज्या जिल्ह्यात अद्याप पूर्णपणे कामकाज सुरू झालेले नाही, तेथील कोरोनाच्या स्थितीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तसेच न्यायालयीन कामकाजातील अडचणी समजून घेत त्या दूर करण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा झाली. पुण्यातील कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे, अशी माहिती ऍड. उमाप यांनी दिली.

येथील कामकाज नियमित सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे सोमवारपासून (ता.11) नियमित कामकाज सुरू होऊ शकते. याबाबत दोन ते तीन दिवसांत एसओपी येण्याची येण्याची शक्‍यता आहे. परवानगी मिळाल्यानंतर कोरोनाचे सर्व नियम पाळून आणि योग्य ती सर्व काळजी घेऊन कामकाज चालण्याची खबरदारी बार असोसिएशनने देखील घ्यावी -ऍड. राजेंद्र उमाप, सदस्य, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवा

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT