Gajanan_Marne 
पुणे

मोठी बातमी : गजा मारणे आणि साथीदारांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर कारच्या ताफ्यातून मिरवणूक काढल्या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे आणि त्याच्या दोन साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. भांगडिया यांनी हा आदेश दिला. गजानन ऊर्फ गजा पंढरीनाथ मारणे (वय ४८, रा. शास्त्रीनगर), रूपेश कृष्णराव मारणे (वय ३८) आणि सुनील नामदेव बनसोडे (वय ४०, दोघेही रा. कोथरूड) यांचा जामीन फेटाळण्यात आला आहे.

समाजात दहशत निर्माण पसरविण्याच्या उद्देशाने आरोपींनी रॅली काढली. रॅलीचे चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर व्हायरल केले. आरोपींनी चार जिल्ह्यातील जमावबंदीचे आदेश धुडकावले आहेत. मारणे व त्याचा साथीदारांना नोटीस देऊनही ते हजर झालेले नाहीत. या गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार करण्यासाठी त्यांना कोणी पैसे पुरवले याचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना अटक करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद जामिनाला विरोध करताना अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला. त्याचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

पोलिसांनी केलेला तपास :
- मिरवणुकीत वापरलेली ११ वाहने निष्पन्न झाली आहेत
- रॅलीचे उर्से व पुणे शहरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहे
- आठ साक्षीदारांकडे तपास करून त्याचे जबाब नोंदवले आहेत
- आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन तपास पथकांची नेमणूक
- व्हायरल फोटो आणि व्हिडिओची माहिती मिळवण्यात येत आहे

मारणे आणि साथीदारांना नोटीस :
मारणे आणि त्याच्या साथीदारांविरोधात चांदणी चौकात जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात मारणे आणि साथीदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. वारजे पोलिसांनी ही नोटीस काढली आहे. चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर व्हावे, अशी नोटीस मारणेसह त्याच्या १० साथीदारांच्या घरांवर चिटकविण्यात आली आहे. मिरवणूक प्रकरणी मारणे आणि साथीदारांविरोधात कोथरूड, तळेगाव दाभाडे, वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मारणे आणि साथीदारांना जामीन मिळाला नसून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

या गुन्ह्यात पाहिजे आरोपींची नावे :
- श्रीकांत संभाजी पवार (वय ३४)
- गणेश नामदेव हुंडारे (३९)
- सचिन अप्पा ताकवले (वय ३२)
- प्रदीप दत्तात्रेय कंधारे (वय ३६)
- मेहबूब मोर्तुजा महम्मद सय्यद (वय ३३)
- राजशेखर यलप्पा बासगे (वय २६)
- जयवर्धन जयपाल बिरनाळे (वय २४)
- लक्ष्मण एकनाथ आल्हाट (वय ४०)
- सुनील ज्ञानोबा कांबळे (वय ३१)
- आशिष बापूराव पिसाळ (वय २२)
- बापू श्रीमंत बागल (वय ३४),
- अनंता ज्ञानोबा कदम (वय ३७)
- इतर १५० समर्थक

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT