download-(1).jpg
download-(1).jpg 
पुणे

पुणे : सत्र न्यायालयाने फेटाळला नगरसेवक रविंद्र धंगेकरांचा अटकपूर्व जामीन

सकाळवृत्तसेवा

पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. तर याच प्रकरणात गुन्हा दाखल असलेले नगसेवक अरविंद शिंदे यांना दोन दिवसांपुर्वीच अटकपूर्व जामीन मिळाला आहे. 

बेकायदा जलपर्णी निविदा काढण्याच्या प्रकरणात महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी नगरसेवक व अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यावेळी धंगेकर यांनी निंबाळकर यांच्या दिशेने चप्पल फेकुन मारली होती. तर एका कार्यकर्त्यांने निंबाळकर यांना किरकोळ मारहाण केली होती. त्यानंतर निंबाळकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून धंगेकर, शिंदे यांच्यासह 17 जणाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

त्यानंतर शिंदे यांनी तत्काळ न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन प्राप्त केला होता. त्यानंतर धंगेकर यांनीही अर्ज केला, मात्र  संबंधित घटनेमागे धंगेकर हेच असल्याचा युक्तीवाद पोलिसांनी केला. त्यानुसार न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला.
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT