पुणे

राहुल गांधी यांना न्यायालयाचे समन्स

CD

पुणे, ता. ३० : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी येत्या १९ ऑगस्टला न्यायालयासमोर हजर राहावे आणि आपले म्हणणे मांडावे,’ असा आदेश येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिला आहे. न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

राहुल गांधी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांनी केलेल्या तक्रारीत आढळलेले तथ्य आणि विश्रामबाग पोलिसांचा तपासणी अहवाल प्रथमदर्शनी ग्राह्य धरीत न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी नुकताच तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला. त्यामध्ये राहुल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढ‌ळून आले असून, या अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०४ नुसार (आरोपीला हजर होण्यासाठी समन्स बजावणे) कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील तारखेला पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
------------
काय आहे प्रकरण
गेल्या वर्षी राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर भाषण केले होते. त्यात त्यांनी डोकलाम आणि सावरकरांचा संदर्भ दिला होता. ते म्हणाले होते की, सावरकर आणि त्यांचे पाच-सहा मित्र एका मुस्लिम व्यक्तीला मारत होते. तेव्हा सावरकरांना आनंद होत होता, असे त्यांनी पुस्तकात लिहिले आहे, तसेच डोकलामचा उल्लेख करीत ‘समोरचा पक्ष कमजोर असेल तर त्याला मारावे आणि जर आपण कमजोर असू तर पळून जावे,’ असे विधान गांधी यांनी केले होते. या विधानाप्रकरणी सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पुणे न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
----------------
राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढ‌ळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे. आता पोलिसांच्या अहवालाच्या आधारे न्यायालयाकडून ‘सीआरपीसी’च्या कलम २०४ नुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्याप्रमाणे राहुल गांधी यांना पुढील तारखेला न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अॅड. संग्राम कोल्हटकर, सात्यकी सावरकर यांचे वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT