Kamala Nehru Hospital Pune Sakal
पुणे

परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यात 15 ठिकाणी लसीकरण

महापालिकेने शहरातील १५ केंद्रांवर उद्या (ता. १) ४५च्या पुढील वयोगटातील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीनच्या दुसऱ्या डोससाठीचे नियोजन केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेने (Municipal) शहरातील १५ केंद्रांवर उद्या (ता. १) ४५ च्या पुढील वयोगटातील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीनच्या (Covaxin) दुसऱ्या डोससाठीचे (Second Dose) नियोजन (Managament) केले आहे. कमला नेहरू रुग्णालयात परदेशी शिक्षणासाठी (Abroad Education) जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (Student) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. (Covaxin Vaccination For Students going for Study Abroad)

महापालिकेकडे कोव्हॅक्सीनचे दोन हजार पेक्षा कमी डोस सोमवारी उपलब्ध होते, त्यामधूनच मंगळवारी १५ केंद्रांवर कोव्हॅक्सीनच्या दुसऱ्या डोससाठी लसीकरण केले जाणार आहे, ज्या नागरिकांनी ४ मे पूर्वी पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना मंगळवारी दुसरा डोस मिळणार आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

महापालिकेकडील डोस उपलब्ध नसल्याने कोव्हिशील्डचे लसीकरण बंद केले आहे. मात्र, जे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जाणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी कमला नेहरू रुग्णालयात मंगळवारी व बुधवारी खास कोव्हिशील्डची लसीकरण मोहीम आयोजित केली आहे. महापालिकेने यासाठी इमेलवर विद्यार्थ्यांकडून त्याचे कागदपत्र मागविले होते. त्यानुसार मंगळवारी व बुधवारी ज्यांचे लसीकरण केले जाणार आहे, त्यांना इमेलवरूनच कोणत्या वेळेत उपस्थित रहायचे आहे हे कळविण्यात आले आहे. मात्र, महापालिकेकडे ५०० विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी अर्ज केले आहेत, त्यामुळे महापालिकेला या विद्यार्थ्यांसाठी आणखी काही दिवसांचे नियोजन करावे लागेल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

१४ हजार लसीकरण

दरम्यान महापालिकेने आज (सोमवारी) महापालिका व खासगी दवाखान्यात मिळून शहरात १४ हजार २९९ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये खासगी लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील १२ हजार २०४ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT