Covaxin  
पुणे

पुरंदरकर कोव्हॅक्सिनच्या प्रतिक्षेत

आता दुसरा डोस घेण्याचा कालावधी जवळपास संपत आला आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत तातडीने ही लस उपलब्ध होणे गरजेचे आहे.

योगेश कामथे ः सकाळ वृत्तसेवा

खळद : कोरोना लसीकरण सुरू झाल्यावर पुरंदर तालुक्यात मार्च महिन्यात ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या काही नागरीकांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे. हे सर्व नागरिक आता दुसऱ्या डोससाठी लशीच्या प्रतिक्षेत आहेत, मात्र ही लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक धास्तावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात जवळपास २ हजार नागरीकांना ही देण्यात आली आहे. या नागरीकांना आता दुसरा डोस घेण्याचा कालावधी जवळपास संपत आला आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत तातडीने ही लस उपलब्ध होणे गरजेचे आहे.

यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी उज्वला जाधव यांच्याशी संपर्क केला असता, आम्ही वरिष्ठ कार्यालयात लशीची मागणी केली आहे, परंतु २ हजार लशीची आवश्यकता असताना संपूर्ण तालुक्यासाठी फक्त पन्नास लशी उपलब्ध झाल्या आहेत. नागरिकांचे पहिल्या लसीचे दिवस पाहून त्यांना संपर्क करून त्या आम्ही दिल्या आहेत. इतरांसाठी लस कधी उपलब्ध होईल हे मात्र सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT