ambulance  E Sakal
पुणे

प्लिज! अ‍ॅम्बुलन्सचा सायरन वाजवू नका; छातीत धडकी भरते...

ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त आहे, असे असताना अनेकदा रुग्णवाहिकेत रुग्ण नसतानाही रुग्णवाहिकेचे चालक सायरन वाजवत रुग्णवाहिका वेगाने नेतात.

सकाळ डिजिटल टीम

बारामती : कोरोनाने समाजाची मानसिकताच बदलून गेल्याची अनेक उदाहरणे डोळ्यासमोर येतात. अनेक बाबतीत लोकांची विचारांची पध्दतच बदलून गेली आहे. अनेक गोष्टींनी आता लोकांच मन कातर होऊ लागलं आहे. अशीच एक गोष्ट सध्या बारामतीत लोकांच मन कातर करत आहे, ती म्हणजे रुग्णवाहिकांचा सायरन. बारामतीतील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप शिंदे यांनी रुग्णवाहिकांचा विनाकारण सायरन वाजवू नका, असं आवाहन केल आहे. सध्या बारामतीत कडकडीत लॉकडाऊन सुरु आहे, रस्ते रिकामे आहेत, कोठेही गर्दी नाही, ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त आहे, असे असताना अनेकदा रुग्णवाहिकेत रुग्ण नसतानाही रुग्णवाहिकेचे चालक सायरन वाजवत रुग्णवाहिका वेगाने नेतात.

सायरनचा वापर गर्दीतून वेगाने मार्गक्रमण होण्यासाठी केला जातो, सध्या लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे, अशा स्थितीत सायरनचा होणारा विनाकारण वापर हा अनेकांना त्रासदायक वाटत आहे. विशेषतः ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे अशा अनेकांच्या छातीत सायरनचा आवाज धडकी भरवतो, त्या मुळे प्रशासनाने याची दखल घेत सायरनचा वापर गरज असेल तेथेच करण्याबाबत रुग्णवाहिकेच्या चालकांना सूचना द्याव्यात अशी मागणी प्रदीप शिंदे यांनी केली आहे.

छातीत धडकी भरते....

रुग्णवाहिकेच्या सततच्या सायरनच्या आवाजाने अनेकांच्या छातीत धडकी भरते. रोजच्या कोरोनाच्या मृत्यूच्या बातम्यासह आकडेवारीने अगोदरच लोक भयभीत आहेत, त्यात सतत काही वेळाच्या अंतराने सायरनचे आवाज करत रुग्णवाहिका जातात, लॉकडाऊनमुळे नीरव शांतता असते, त्यात सायरनच्या आवाजाने अनेकांना मानसिक त्रास होतो, वयोवृध्द व महिलांना याचा जास्त त्रास होतो. प्रशासनाने याची दखल घेत विनाकारण वाजणाऱ्या सायरनचा आवाज तातडीने बंद करावा, अशी विनंती बारामतीमधील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप शिंदे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Exam: नीट पेपर लीक प्रकरणात नवा खुलासा; २७ एप्रिललाच शुभमच्या हातात प्रश्नपत्रिका... उत्तर प्रदेश - हरियाणा कनेक्शनही समोर

Latur News: लातुरच्या शिक्षण बाजारात ५०० कोटींची उलाढाल, प्रामाणिक पॅटर्नला क्लासेसच्या जीवघेण्या स्पर्धेनं गालबोट, 'मॅनेज'साठी नवा फंडा

शेतकरीपुत्राने कसं उभारलं RCC क्लासेसचं १०० कोटींचं साम्राज्य, एक खोली ते ८ शहरांमध्ये विस्तार; कोण आहे शिवराज मोटेगावकर?

Akola News: पाच दिवस ‘हीटवेव्ह’चा इशारा; पारा ४६.३ अंशांवर : दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळा; आरोग्याला जपा

Latest Marathi News Live Update : आज विदर्भात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT