पुणे

कोविड-19 ची चाचणी होणार आणखी जलद; कारण...

सकाळवृत्तसेवा

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या 'मोबाईल जीवाणूशास्त्र संशोधन आणि तपासणी प्रयोगशाळे'चे (एमव्हीआरडीएल) उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हे उद्घाटन करण्यात आले.

या प्रयोगशाळेची माहिती देताना डीआरडीओच्या 'डायरेक्टोरेट ऑफ इंडस्ट्री इंटरफेस अँड टेक्नोलॉजी मॅनेजमेंट'चे (डीआयआयटीएम) संचालक डॉ. मयंक द्विवेदी म्हणाले, " एमव्हीआरएल ही पहिली अशी प्रयोगशाळा आहे त्यामध्ये कोरोनाची जलदगतीने चाचणी आणि संबंधित संशोधन आणि विकास कामांना गती मिळते.

डीआरडीओच्या तंत्रज्ञानाचा वापर करत हैद्राबाद येथील ईएसआयसी रुग्णालय आणि खाजगी उद्योगांच्या वतीने या प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी ईएसआयसी रुग्णालयाशी सल्लामसलत करून डीआरडीओच्या हैद्राबाद येथील संशोधन केंद्र इमारत (आरसीआय) येथे ही प्रयोगशाळा विकसित करण्यात आली. ही प्रयोगशाळा आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करण्यासाठी डब्ल्यूएचओ आणि आयसीएमआर जैव सुरक्षा निर्देशानुसार तयार करण्यात आली. यामध्ये विद्युत नियंत्रणे, लॅन, टेलिफोन केबलिंग आणि सीसीटीव्हीसारख्या संसाधनांचा समावेश आहे. जैव सुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या या श्रेणी 2 व श्रेणी-3 प्रयोगशाळांची निर्मिती फक्त 15 दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आली.''

ही मोबाईल प्रयोगशाळा कोविड-19 च्या निदानासाठी आणि औषध चाचणीसाठी जीवाणू वृद्धी, कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्मासाधित उपचार, कोविड-19 रूग्णांची व्यापक रोगप्रतिकारकशक्ती तपासणे, या लसीच्या विकासासाठी विशिष्ट 'क्लिनिकल' चाचणीसाठी महत्त्वपूर्ण असेल.

"डीआरडीओ आपल्या तंत्रज्ञाचा वापर करत कोविड 19 च्या विरोधात लढा देण्यासाठी लागणाऱ्या संसाधनांची निर्मितीवर भर देत आहे. तसेच याचा लाभ प्रशासन आणि वैद्यकीय कर्मचार्यांना जास्तीत जास्त मिळावा याची काळजी घेतली जात आहे. यासाठी या सर्व उपकरणांची किंमत कमी ठेवण्यात आली असून, या कठीण काळात रुग्णालयांना या उपकरणांना विकत घेणे सोपे असेल यावर लक्ष केंद्रित केले जात आहे." 

- डॉ. मयंक द्विवेदी

'एमव्हीआरडीएल'चे वैशिष्ट्ये

- प्रयोगशाळेत दररोज 1000 ते 2000 नमुन्यांची तपासणी केली जाते
- कोविड-19 ची जलदगतीने चाचणी आणि संबंधित संशोधन करणे सोपे
- प्रयोगशाळा आवश्यकतेनुसार देशात कुठेही घेऊन जाऊ शकतो
- सर्व वैद्यकीय आणि तांत्रिक सुविधांनी सज्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी बातमी! जमिनींच्या पोटहिस्साबाबत राज्यभूमी अभिलेख विभागाचा माेठा निर्णय; लवकरच हाेणार अंमलबजावणी, काय आहे निर्णय?

Chhatrapati Sambhajinagar: कन्नड तालुक्यात ‘वाळवण’ कामांची लगबग सुरू; पहाटेपासून तयारी ; कडक उन्हामुळे गृहिणींचा कल कुरडई, पापड अन् सांडग्यांकडे

Chhatrapati Sambhajinagar: शाळेच्या प्रवेशद्वारावरच दुर्गंधी; घाटनांद्र्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; उपाययोजनेची मागणी

Latest Marathi News Live Update : अखेर ट्रम्प यांचे एक पाऊल मागे; इराणवरील हल्ले तूर्त टळले

'अररर.... एवढा भारी सिनेमा बनवला पण एक', धुरंधर 2 ची 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, Viral Video

SCROLL FOR NEXT