covid 19 vaccination 
पुणे

लसीकरणाचा खरंच फायदा होतो? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं

सम्राट कदम

पुणे - कोरोनाची लस टोचल्यावरही विषाणूची बाधा झाल्याची निवडक उदाहरणे पुढे आली आहेत. त्यामुळे लसीकरणाचा खरच फायदा होतो का, कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी लसीकरण खरंच प्रभावी ठरेल का यासह अनेक प्रश्न आपल्या मनात आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा...

- लसीचा फायदा काय?
देशाची सर्वोच्च संशोधन संस्था समजल्या जाणाऱ्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे म्हणतात, ‘‘सध्या उपलब्ध लसींमुळे कोरोना विषाणूची तीव्रता कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याबद्दल वैज्ञानिक समुदायात ठाम मत तयार झाले आहे. लसीकरणानंतरही जर कोरोना झाला तर त्यामुळे रुग्ण अत्यवस्थ (क्रिटिकल) अवस्थेत जाण्याचे प्रमाण जवळजवळ नसल्यात जमा आहे. लसीकरणामुळे केवळ मृत्यूदर कमी होणार नाही तर हॉस्पिटलायझेशन कमी होईल. मागील दोन महिन्यात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांच्या आधारे जवळ जवळ सर्वच म्युटेशनवर कोरोनाच्या लसी प्रभावी ठरत असल्याचे दिसत आहे.

- लसीच्या दुसऱ्या मात्रेची आवश्यकता का?
लशीची पहिली मात्रा शरिरात रोगप्रतिकारशक्ती विकसित करण्यास सुरवात करते. तर दुसरी मात्र तयार झालेला रोगप्रतिकारशक्तीला ‘बूस्ट’ देते. काही कारणाने पहिल्या मात्रेत रोगप्रतिकारशक्ती कमी विकसित झाली तर दुसऱ्या मात्रेने ती कमी भरून निघते. तसेच दीर्घकाळ रोगप्रतिकारशक्ती टिकविण्यासाठी दुसऱ्या मात्रेची गरज आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

- लशीच्या दोन मात्रांमध्ये अंतर का?
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला सांगतात, ‘‘सुरवातीला कोव्हिशिल्ड लसीची दुसरी मात्रा घेण्यासाठी २८ दिवसांचे अंतर ठेवण्यात आले होते. त्यामुळे लसीची परिणामकारकता ७० टक्के नोंदवली गेली. आता नव्याने काही संशोधने समोर आले आहे. त्यानुसार अडीच ते तीन महिन्यांनी ‘कोव्हिशिल्ड’ लस घेतल्यास परिणामकारकता ९० टक्क्यापर्यंत वाढते. लान्सेट शोधपत्रिकेत यासंबंधी शोधनिबंध प्रकाशित झाला असून, ऑक्सफर्डच्या वतीनेही याला पुष्टी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT