hadpasar.jpg 
पुणे

हडपसरकरांमध्ये 'त्या' स्बॅब सेंटरबाबत 'थोडी खुशी, थोडा गम'

संदीप जगदाळे

हडपसर (पुणे) : कै. रामचंद्र बनकर शाळेत सुरू करण्यात आलेल्या महापालिकेच्या स्वॅब सेंटरमध्ये रोज ३०० रूग्णांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. या केंद्रात ३०० संशयित रूग्णांना टोकन वाटप करण्यात येते. त्यानंतर उर्वरीत संशयित रूग्णांना पुन्हा घरी जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरु नये म्हणून गर्दी व संपर्क टाळणे हे खूप महत्वाचे आहे. मात्र ते पाळले जात नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे स्वॅब सेंटरची क्षमता वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


वैद्यकिय अधिकारी निलीमा चुनखरे म्हणाल्या, सात जुलैपासून हे केंद्र या ठिकाणी सुरू झाले आहे. तेव्हांपासून आजपर्यंत २ हजार ८३७ संशयित रूग्णांची तपासणी केली असून ६६१ रूग्णांचे अहवाल हे पॅाझिटिव्ह आले आहेत. या शाळेत सुरवातीला क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात आले होते. येथील क्वारंटाइन सेंटर बंद करून तेथील रूग्ण येवलेवाडी, बाणेर, शिवाजीनगर, विमाननगर या सेंटरवर पाठविण्यात आले आहेत. आता याठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोविड केअर सेंटर ( सीसीसी ) सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांवर येथे उपचार करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक त्या तरतूदी करण्यात येत असून दोन दिवसात पूर्ण क्षमतेने येथे सीसीसी सेंटर सुरू होईल, तसेच याठिकाणी गरजू  ९ व्हेंटीलेटर उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती यांनी दिली.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नागरिक संजय दिवटे म्हणाले, बनकर शाळेतील स्वॅब सेंटरमध्ये मी गेल्या दोन दिवसांपासून हेलपाटे मारत आहे. मला खूप त्रास होत असल्याने माझ्या फॅमिली डॅाक्टरांच्या सांगण्यानुसार मी स्वॅबची तपासणी करण्यासाठी गेलो. खूप विनंती करून्ही केंद्रातील अधिकारी व कर्मचारी मला टोकन देत नाही. त्यामुळे मी खूप तणावाखाली आहे. हडपसर-मुंढवा सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरिक्षक संजय धनवट म्हणाले, आमच्या हद्दीतील प्रत्येक प्रभागातील सॅनिटरी इंन्सपेक्टर रोज आपल्या प्रभागातील संशयित रूग्णांची यादी स्वॅब सेंटरमध्ये देत असतात. या यादीतील संशयित रूग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यादीतील नागरिकांना तपासणीसाठी प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी आपण राहत असलेल्या प्रभागातील सॅनिटरी इंन्सपेक्टरकडील यादीत आपले नाव द्यावे. त्या नंतरच तपासणी केली जाईल. त्यामुळे यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी थेट या केंद्रात येऊ नये. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT