पुणे

रिपोर्ट निगेटिव्ह मात्र, फोन येतो तुम्ही पॉझिटिव्ह ! 

सकाळवृत्तसेवा

पुणे -  गुलटेकडी येथील ओसवाल कुटुंबातील सर्व सदस्यांनी 17 ऑगस्टला महापालिकेच्या बिबवेवाडी येथील कोविड केअर सेंटरवर कोरोनाची तपासणी केली. 19 ऑगस्टला सर्वजण निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट त्यांच्या हातात देण्यात आला. त्यामुळे सगळे आनंदात होते. 

मात्र, आठ दिवसानंतर म्हणजे 25 ऑगस्टला त्याच केअर सेंटरवरून ओसवाल यांना फोन आला, की तुमच्या दोन सुना आणि तीन नातवंडे पॉझिटिव्ह आली आहेत. ताबडतोब एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती व्हा. हे ऐकून घरात घबराटीचे वातावरण पसरले. 

महापालिकेच्या कोविड केअर सेंटरवर कशाप्रकारे गोंधळ सुरू आहे, त्याचे हे उदाहरण. 19 ते 25 ऑगस्ट दरम्यान ओसवाल कुटुंबीयांनी कुठेही पुन्हा चाचणी केलेली नाही. असे असतानाही निगेटिव्ह आलेला रिपोर्ट आठ दिवसात पॉझिटिव्ह कसा झाला, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. त्याचे उत्तर अद्यापही त्यांना मिळाले नाही. एवढेच नव्हे, तर त्यांना एका खासगी हॉस्पिटलचे नाव घेऊन, तेथे भरती व्हा, असा सल्लाही त्या कोविड केअर सेंटरवरून दिला. एक नव्हे, तर तीन- तीन अधिकाऱ्यांनी फोन करून, त्यांचा अगदी पिच्छा पुरवला. अखेर पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर फोन येणे बंद झाले. हा अनुभव 67 वर्षीय चंदुलाल ओसवाल सांगत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चंदुलाल यांची पत्नी, अजय आणि अभय अशी दोन मुलगे, दोन सुना आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. 14 ऑगस्ट रोजी त्यांच्या अजय नावाच्या मुलाला त्रास होऊ लागल्याने बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अग्निशामक दल केंद्रावरील सेंटरवर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये क्‍वॉरंटाईन करण्यात आले. त्यानंतर 17 ऑगस्टला चंदुलाल आणि त्यांच्या कुटुंबीयांतील अन्य सदस्यांनी याच सेंटरवर तपासणी केली. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. ते निगेटिव्ह असल्याचे सर्टिफिकेटस त्यांना 19 ऑगस्ट रोजी देण्यात आले. असे असताना अचानक 25 ऑगस्टपासून त्यांना फोन सुरू झाले. तुमच्या दोन्ही सुना आणि नातवंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तेथून पुढे हा सर्व गोंधळ सुरू झाला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून, माहिती घेण्यात येईल, असे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली भुतकर यांनी सांगितले. 

काय खरे आणि काय खोटे ! 
चंदुलाल यांच्या अभय या मुलाची तपासणी 19 ऑगस्टला करण्यात आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे सुरवातीला सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा फोन आला. अभयचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले. आठ दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आले. 25 ऑगस्टला महापालिकेकडून फोन आला. त्यामध्ये अभयचा रिपोर्ट निगेटिव्ह होता. चुकून तो पॉझिटिव्ह सांगितले. तुमच्या दोन सुना व तिन्ही नातवंडे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे नक्की काय खरे आणि काय खोटे असा प्रश्‍न त्यांच्या कुटुंबीयांपुढे पडला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT