पुणे

पुणे महापालिकेकडून 'कोविड शववाहिनी' अ‍ॅप; स्मशानभूमीही लगेच कळणार

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे: पुण्यात रोज कोरोनाने सरासरी दीडशे जणांचा मृत्यू होत आहे. पण रुग्णवाहिका मिळण्यापासून ते अंतविधीसाठी स्मशानभूमी मिळे पर्यंत नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने खास ‘कोविड शव वाहिनी’ हे ॲप तयार केले आहे. त्यावर रुग्णवाहिका मिळणार आहेच, पण त्याचबरोबर कोणत्या स्मशानभूमीत लगेच अंत्यसंस्कार होतील याची माहीत नातेवाईक, रुग्णालय व शववाहिकेच्या चालकाला मिळणार आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून या आजाराने मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना मृत्यांचे शव कुटुंबीयांना न देता. पालिकेतर्फेच त्यांचे अंत्यसंस्कार केले जातात. मृत व्यक्तीला शववाहिका मिळावी यासाठी हेल्पलाइन सुरू केली, पण त्यावर फोन लागण्यास अडचणी येत आहेत. मृतांची संख्या वाढत असताना हेल्पलाइन उपयोगी ठरत नसल्याने नातेवाईक, रुग्णालयातील कर्मचारी यांना त्रास सहन करावा लागत आहे. मनस्ताप कमी करण्यासाठी ॲप तयार केले आहे.

शवाहिकेसाठी सुरू केलेल्या क्रमांकावर फोन करून रुग्णालयातील कर्मचाऱ्याने किंवा नातेवाईकाने डेथ पास क्रमांक सांगितल्यानंतर पालिकेने नेमलेली व्यक्ती हा क्रमांक ॲपमध्ये टाकेल. त्यावेळी मृताची सर्व माहिती आॅनलाइन उपलब्ध होईल. त्याच बरोबर रुग्णालयाच्या जवळच्या भागात असलेल्या शववाहिकेचा क्रमांक, चालकाचे नाव त्याचा मोबाईल क्रमांक मिळेल. ही शववाहिका बुक झाल्यानंतर लगेच अंत्यसंस्कार करायचे आहे ही माहिती एसएमएसद्वारे नातेवाईक, चालक आणि रुग्णालय प्रशासनाला जाईल.

‘‘शहरात रोज किमान १५० जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. त्याचा ताण निर्माण होत असल्याने हे ॲप तयार केले आहे. या ॲपमुळे नातेवाइकांना शववाहिका व स्मशानभूमी यासाठी धावाधाव करावी लागणार नाही. स्मशानभूमीतील वेटिंग कमी होईल.’’

- श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

‘‘कोविडने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंतिम संस्कार होईपर्यंत त्याच्या नातेवाइकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. हा त्रास कमी करण्यासाठी हे नवीन ॲप नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल.

- गणेश बिडकर, सभागृह नेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT