pune corona test covid patient death new cases 
पुणे

पुण्यात येताना निगेटिव्ह रिपोर्ट हवा; एक जूनपर्यंत निर्बंध

निर्बंधांची ही मुदत नव्याने १ जून सकाळी सातपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश शुक्रवारी सायंकाळी अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी काढले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरात लागू करण्यात आलेले निर्बंध एक जूनपर्यंत वाढविण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश शुक्रवारी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी काढले. नव्या आदेशानुसार परराज्यातून पुणे शहरात येणाऱ्या प्रवाशांना ४८ तास आधी केलेल्या कोविड-१९ आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र जवळ बाळगणे बंधनकारक केले आहे. शनिवारी आणि रविवारी अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेकडून १५ मे पर्यंत शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या कालवधीत सोमवार ते शुक्रवार या काळात सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. शनिवारी आणि रविवारी कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. दरम्यान, निर्बंधांची ही मुदत नव्याने १ जून सकाळी सातपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश शुक्रवारी सायंकाळी अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी काढले.

परराज्यातून पुण्यात येणाऱ्या नागरिकांना ४८ तास आधीचे कोरोना चाचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र जवळ बाळगणे नव्याने बंधनकारक करण्यात आले आहे. तर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून केवळ दोनपेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. परराज्यातून माल घेऊन पुण्यात येणाऱ्या वाहनांनाही हे प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करण्यास परवानगी राहणार आहे.

असे असतील नवे आदेश

-सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते अकरा अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार

-शनिवार-रविवार कडक निर्बंध

-परराज्यातून पुणे शहरात माल घेऊन येणाऱ्या वाहनांनादेखील निगेटीव्ह प्रमाणपत्र बंधनकारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT