पुणे

सलग दुसऱ्या दिवशी सहा जणांवर चाचणी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना प्रतिबंधक "कोविशिल्ड' लशीची सलग दुसऱ्या दिवशी सहा स्वयंसेवकांवर मानवी चाचणी करण्यात आली. भारती हॉस्पिटलमध्ये चार तर, केईएम रुग्णालयाच्या वढू केंद्रावर दोन स्वयंसेवकांना गुरुवारी लस देण्यात आली. बुधवारी (ता. 27) केलेल्या पहिल्या मानवी चाचणीतील दोन्ही स्वयंसेवकांना कोणताही त्रास झाला नाही, असे निरीक्षण टिपण्यात आले आहे. 

ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी, ऍस्टॅजेनेका आणि पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी एकत्रित येऊन, कोविशिल्ड ही लस तयार केली असून, 

तिची मानवी चाचणी बुधवारपासून पुण्यात सुरू झाली. देशातील ही पहिली मानवी चाचणी असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष पुण्यावर केंद्रित झाले आहे. भारती हॉस्पिटल, केईएम रुग्णालयाचे वढू केंद्र, जहॉंगीर रुग्णालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय या चार केंद्रांवर पुण्यात मानवी चाचण्या होणार आहेत. देशभरातील 16 केंद्रे त्यासाठी निवडण्यात आली आहेत. 

भारती विद्यापीठात लस दिलेल्या दोन्ही स्वयंसेवकांना कसलाही त्रास झालेला नाही. लशीचे कोणतेही दुष्परिणाम त्यांच्यावर जाणवले नाही. तसेच, लस टोचलेल्या जागीही कोणतीही रिअँक्‍शन आलेली दिसली नाही, अशी माहिती भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी दिली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुढील मानवी चाचणीसाठी आणखी पाच जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी चार जणांना प्रत्यक्ष लस देण्यात आली. उर्वरित एका स्वयंसेवकाच्या रक्तात प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) तयार झाली होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या नकळत कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट होते. या आधारावर त्यांना या मानवी चाचणीत सहभागी होता आले नाही. पण, उर्वरित एक पुरुष आणि तीन स्त्रियांना कोविशिल्ड लस देण्यात आली. येत्या शुक्रवारी (ता. 28) निवडक स्वयंसेवकांवर ही चाचणी करण्यात येईल. त्यासाठी सुमारे 14 स्वयंसेवकांची तपासणी करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केईएम रुग्णालयाच्या वढू केंद्रातील डॉ. आशिष बावडेकर म्हणाले, की दोन स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली. उर्वरित स्वयंसेवकांवर पुढील काही दिवसांमध्ये लस दिली जाईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि जहॉंगीर रुग्णालय येथेही लशीच्या मानवी चाचणीला परवानगी मिळाली आहे. येत्या आठवड्यात या केंद्रांवरही लशीच्या चाचण्या सुरू होतील, अशी माहिती मिळाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

SCROLL FOR NEXT