mahalunge 
पुणे

थरार, गोठ्यात शिरलेल्या बिबट्याशी गाईने दिली झुंज 

विवेक शिंदे

महाळुंगे पडवळ (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील दरेकरवस्ती- लौकी येथील राजेंद्र रामदास वाळूंज यांच्या गावठी गाईच्या गोठ्यात बिबट्याने शिरकाव करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, गाईने केलेल्या प्रतिकारामुळे बिबट्याला पळ काढावा लागला. गोठ्यातील दहा कोंबड्या मात्र बिबट्याच्या शिकार झाल्या आहेत. रविवारी (ता. ५) बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे.

लौकी- दरेकरवस्ती येथे राजेंद्र वाळूंज यांच्या घराशेजारीच पाच गावठी गाई व एक वासरू, असा एकूण सात जनावरांचा गोठा आहे. तसेच, ३५ एकर डाळिंबाची बागही घरासमोरच आहे. चोरट्याच्या उपद्रवामुळे गेल्या वर्षी त्यांचे डाळिंब पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे या वर्षी त्यांनी घराभोवती व डाळिंब बागेभोवती सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. विशेष म्हणजे कॅमेरे बसविल्यानंतर पहिल्याच दिवशी चोरट्यांऐवजी बिबट्याच दिसला. बिबट्या व गाईचा थरारही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बिबट्याने दहा कोंबड्या फस्त केल्या आहेत. या भागात बिबट्याचा नेहमीच वावर आहे. वाळूंज यांनी सदर घटना स्थानिक ग्रामस्थांद्वारे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वनरक्षक कैलास दाभाडे, कल्पना पांढरे, राजेंद्र गाढवे व कर्मचारी कोंडीभाऊ डोके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील शेतामध्ये बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने ग्रामस्थांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रविवारी परिसरात पिंजरा लावला आहे. पिंजऱ्यात सावज म्हणून शेळी ठेवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

Marathwada Rain: ५० दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस; हिंगोली, जालना, नांदेडसह धाराशिवमध्ये सरी

Global Warming: ‘सुपर एल निनो’मुळे १५ हजार मृत्यूचा धोका; शिकागो विद्यापीठाचा इशारा, जमीन आणखी तापणार

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Farmers: पंचनामे कागदावर नको, थेट बांधावर करा; महसूलमंत्री बावनकुळे यांचे निर्देश; ग्रामसेवक, कृषी साहाय्यक, तलाठींची उपस्थिती बंधनकारक

SCROLL FOR NEXT