cow milk 
पुणे

Cow Milk Rate Hike: गायीचं दूध महागलं! दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ

Cow Milk Rate Hike: पुण्यात पार पडलेल्या दुध उत्पादकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Cow Milk Rate Hike: गायीच्या दुधाच्या दरात आता २ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना आता प्रतिलिटरमागे दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहे. पुण्यात पार पडलेल्या दुध उत्पादकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (Cow Milk Rate Hike Increase in price by Rs 2 per litre)

गायीचं दूध आजपासून दोन रुपयांनी महागलं आहे. दूध पाऊच विक्री दरात दोन रुपयांनी दरवाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांनी घेतला असल्याचं माहिती संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी दिली. पुणे जिल्हा दूध संघाच्या (कात्रज डेअरी) कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी राज्यातील विविध सहकारी व खाजगी संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्यानं चितळे डेअरी, पराग मिल्क, गोविंद दूध, नेचर डिलाईट, उर्जा, राजहंस, संतकृपा, एसआर थोरात, कात्रज, गोदावरी, अनंत, सोनाई, अक्षरा मिल्क, सुयोग मिल्क आदी संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही दरवाढ गायीच्या दूधासाठी असणार आहे. याआधी साधारणतः ५४ रुपये दूध दर होता, आता तो २ रुपयांनी वाढल्याने ५६ रुपये होणार आहे.

शासनानं जाहिर केलेलं गाय दूध अनुदानाचं धोरण १ जुलै २०२४ पासून लागू केलेलं आहे. त्यानुसार दूध खरेदी दरात तीन रुपयांची वाढ ही सर्व संघांना स्वतः द्यावी लागणार आहे. तीन रुपयांची खरेदी दरात वाढ झालेली असली तरीही विक्री दरात मात्र दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचं संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितलं.

दूध विक्रीची सद्यस्थिती

  • राज्यभरात एकूण विक्री होणारे दूध - ६५ ते ७० लाख लिटर

  • कल्याणकारी संघाच्या माध्यमांतून होणारी विक्री - ४० ते ४२ लाख लिटर

  • पुणे शहरात विक्री होणारे दूध - १८ ते २० लाख लिटर

  • संघाच्या माध्यमांतून पुणे शहरात होणारी विक्री - १२ ते १३ लाख लिटर

  • पिशवीबंद दुधाची उपलब्धता- पाव, अर्धा आणि एक लिटर पॅक

  • पिशवीबंद गायीच्या नव्या दूधाचा दर - ५६ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT