पुणे

सांगवी, पिंपळे गुरवमध्ये कारवाई

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपळे गुरव, ता. २७ ः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभागांतर्गत सांगवी, पिंपळे गुरव परिसरात अनधिकृत फ्लेक्स व बॅनरविरोधात शुक्रवारी (ता. २७) मोठी कारवाई करण्यात आली. साई चौक, कृष्णा चौक आणि काटेपुरम चौक परिसरात परवानगीविना लावण्यात आलेले बॅनर हटवण्यात आले.
‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाने विशेष पथक तयार करून ही कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी नियमबाह्यरीत्या उभारण्यात आलेले फ्लेक्स, बॅनर व किऑस्क हटवून जप्त करण्यात आले. अनधिकृत जाहिरातींमुळे परिसराचे सौंदर्य बिघडण्याबरोबरच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ पावले उचलली.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरात अनधिकृत जाहिरातींविरोधातील मोहीम सातत्याने सुरू राहणार असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी कोणतेही फ्लेक्स किंवा जाहिरात साहित्य लावताना आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे.
या कारवाईत २० बाय २० फूटांचे १३ , दहा बाय दहा फुटांचे नऊ, तसेच ११ किऑस्कवर कारवाई करण्यात आली. आकाश चिन्ह परवाना विभागाचा तीन अतिक्रमण अधिकारी, आठ, सहा महापालिका मजूर, पाच कंत्राटी मजूर, दोन छायाचित्रकार, एक लिपिक, तसेच एक पोलीस कर्मचारी या पथकात होता.
---

आदेशानुसार आम्ही आमची कारवाई केली. अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्यात आली.
- पूजा दूधनाळे, ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी
---
साई चौक, कृष्णा चौक आणि काटेपुरम चौक परिसरात अनधिकृत फ्लेक्समुळे रस्त्यांचे विद्रूपीकरण होत होते तसेच काही ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता. महापालिकेने वेळेत कारवाई केल्यामुळे परिसर स्वच्छ व मोकळा झाला आहे. अशा प्रकारची मोहीम सातत्याने राबवली, तर शहराचे सौंदर्य नक्कीच टिकून राहील.
- एक ज्येष्ठ नागरिक
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Transport: महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतुकीवर सर्जिकल स्ट्राईक! राज्यव्यापी धडक मोहीम सुरू; अंमलबजावणी कधीपासून?

टॉपची कलाकार आणि कोट्यवधींची कमाई असूनही भाड्याच्या घरात राहते ही अभिनेत्री ; महिन्याचं भाडं वाचून बसेल धक्का !

Protein Benefits: फक्त बॉडीसाठी नव्हे, तर दैनंदिन आरोग्य टिकवण्यासाठीही प्रोटीन अत्यंत गरजेचं! जाणून घ्या कारणे

Horscope : उद्यापासून धनदौलत योग! 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ सुरू; नोकरी-व्यवसायात मोठी संधी, अडकलेल्या कामात मिळेल नशिबाची साथ

फी न भरल्याने आठवीतील विद्यार्थ्याला परीक्षेस मज्जाव, शाळेच्या कारवाईविरोधात कडक पाऊल उचलण्याचा इशारा, पनवेलमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT