crane falls in well one die and one injured nasrapur pune  Sakal
पुणे

Pune : विहीरीचे काम चालू असताना क्रेनचे बकेट कोसळले एकाचा मृत्यू,एक जखमी

कोळवडी ता. भोर येथे ग्रामपंचायत विहिरीचे काम सुरू असताना क्रेन चा वायररोप तुटून क्रेन चे बकेट विहिरीत पडले या दुर्घटनेत एक कामगाराचा जागीच मृत्यू झाला.

किरण भदे ः सकाळ वृत्तसेवा

नसरापूर : कोळवडी ता. भोर येथे ग्रामपंचायत विहिरीचे काम सुरू असताना क्रेन चा वायररोप तुटून क्रेन चे बकेट विहिरीत पडले या दुर्घटनेत एक कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून विहिरीत अडकलेल्या सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.

अंकुश प्रभाकर गेडाम वय २३ ( रा. गडचिरोली ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून विजेंद्र रामानंद भारद्वाज वय ४९ ( रा. उत्तरप्रदेश ) असे गंभीर जखमीचे नाव आहे कोळवडी येथील ओढ्यात विहिरीचे खोदकाम सुरू असताना आज सोमवार ता. 29 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास .

ही घटना घडली.विहिरीचे खोदकाम करताना दुपारची जेवणाची सुट्टीनंतर क्रेनच्या बकेटमध्ये बसवून कामगारांना खाली सोडत असताना अचानक क्रेनची वायर रोप तुटून जवळपास ५० फूट खाली बकेट पडला.

वायर रोपचा लोखंडी हुक डोक्यात पडल्याने बकेट मधील अंकुश हे जागीच ठार झाले. घटना घडल्यानंतर घटनास्थळी गावचे पोलीस पाटील अजित शिंदे, प्रमोद शिंदे व इतर कामगारांनी रुग्णवाहिका बोलून जखमींना नसरापूर येथील रुग्णालयात पोहोचवण्यात आले. तसेच विहिरीत इतर काम करत असलेले कामगारांना दुसऱ्या क्रेनच्या साह्याने खाटेवर बसवून बाहेर काढण्यात आले.

या बाबत राजगड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेतली जात असुन घटनेस जबाबदार व्यक्ती वर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे समजते आहे.

बेजबाबदार ठेकेदार अनेक ठिकाणी विहीरीची कामे करताना कोणत्याही सुरक्षा साधना शिवाय धोकादायक पध्दतीने कामे केली जात आहेत कामगारांची सुरक्षा ही ठेकेदारांची जबाबदारी आहे मात्र ती पाळली जात नाही अशा ठेकेदारांवर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honor Killing Case : 40 वर्षाच्या तरुणाचं 19 वर्षाच्या तरुणीवर प्रेम; मुलीच्या घरात कळताच बापानं गाडीतच गळा चिरून केली प्रियकराची हत्या

Mumbai News: मद्य परवानगीवर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह, धोरणाबाबत पुनर्विचार करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरली विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करताना पोलिस प्रशासनाकडून मारहाण

१८७ पदांसाठी ८ हजार उमेदवार, थेट विमानतळाच्या धावपट्टीवर घेतली परीक्षा; पाहा Drone VIDEO

Pirangut Accident : पिरंगुट घाटात भीषण अपघात; तिघेजण जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT