Condom esakal
पुणे

Pune News : वापरलेल्या कंडोमची विल्हेवाट लावण्यासाठी कृती योजना तयार करा; एनजीटीचे राज्य सरकारला निर्देश

सूक्ष्मजंतू किंवा नैसर्गिकरित्या विघटित होत नसल्याने वापरण्यात आलेल्या कंडोमला जैविकरीत्या विघटन न होणारा कचरा मानले जावे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सूक्ष्मजंतू किंवा नैसर्गिकरित्या विघटित होत नसल्याने वापरण्यात आलेल्या कंडोमला जैविकरीत्या विघटन न होणारा कचरा मानले जावे. त्यामुळे महापालिकेने जाळण्याच्या प्रक्रियेद्वारे त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. त्याबाबतचा कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) राज्य सरकारला दिले आहेत.

खंडपीठाचे न्यायाधीश न्यायिक सदस्य दिनेश कुमार सिंह व तज्ञ सदस्य डॉ. विजय कुलकर्णी यांनी हे निर्देश दिले आहेत. याबाबत ‘सहयोग ट्रस्ट’च्या लॉयर्स फॉर अर्थ जस्टिसचे कायद्याचे विद्यार्थी निखिल जोगळेकर, बोधी रामटेके, वैष्णव इंगोले, विक्रांत खरे, ओंकार केनी आणि शुभम बिचे यांनी २०१८ साली याचिका दाखल केली होती.

ॲड. असीम सरोदे आणि ॲड. श्रिया आवले यांच्या मदतीने दाखल केलेल्या या याचिकेत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, पुणे जिल्हाधिकारी, नगर विकास विभाग, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य कायदेशीर सल्लागार समिती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध सहा कंडोम उत्पादन कंपन्यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

या मागण्या करण्यात आल्या होत्या -

- वापरलेले कंडोम फेकण्यासाठी वेगळे पाऊच कंपन्यांनी द्यावेत

- वापरलेल्या कंडोमचा स्वतंत्र कचरा प्रवर्ग तयार करावा

- या कंडोमची शास्त्रीय पद्धतीने जाळून विल्हेवाट लावण्याबाबत सूचना द्यावी

- कचरा वेचकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी त्यांना हातमोजे द्यावेत

- वापरलेल्या कंडोमची विल्हेवाट कशी लावावी याबाबत उत्पादक कंपन्यांनी जनजागृती करावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT