Creative School Award for Parvadi Vidyalaya
Creative School Award for Parvadi Vidyalaya 
पुणे

पारवडीच्या विद्यालयाला कृतीशील विद्यालय पुरस्कार

संतोष आटोळे

शिर्सुफळ : महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने देण्यात येणारा कृतीशील विद्यालय हा जिल्हा पुरस्कार बारामती तालुक्यातून कै. जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालयास प्रदान करण्यात आला.

पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य सखाराम गावडे यांनी दिली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय नेहमीच विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत असते. एक मूल, एक झाड, उपक्रम ग्रामस्वच्छता, जागतिक योगदिन, 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा, विविध मैदानी स्पर्धा आयोजन, बाल चित्रकला स्पर्धा, दरवर्षी शाळेचा इ. 10 वी व 12 वीच्या निकालाचा चढता आलेख, जलसाक्षरता दिन, वन दिन, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध उपक्रम राबवत असते. याची दखल घेत शाळेला पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य विशाल सोळंकी, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गणपत मोरे, एस. एस. सी. बोर्डाचे सचिव भोसले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गावडे, सचिव संगीताताई गावडे, सरपंच जिजाबा गावडे, उपसरपंच अनिल आटोळे, तानाजी गावडे व ग्रामस्थ यांनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन व कौतुक केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT