Crime  Sakal
पुणे

मुल होत नसल्याने सुनेचा छळ केल्याप्रकरणी आठजणांवर गुन्हा

मुल होत नसल्याने जादूटोणा तसेच अघोरी उपाय करून सुनेचा छळ केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मुल होत नसल्याने जादूटोणा (Black Magic) तसेच अघोरी उपाय करून सुनेचा छळ केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह आठ जणांवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक, त्याचे कुटुंबीय आणि एका गुरुजीविरोधात विवाहितेचा छळ, फसवणूक तसेच जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या सुनेने याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या फिर्यादी दिल्या आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात तक्रारदार महिलेचा विवाह बांधकाम व्यावसायिक यांचा मुलगा याच्याशी झाला होता. लग्न ठरविताना त्याने स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदवी मिळाल्याचे सांगण्यात आले.

मात्र, प्रत्यक्षात तो केवळ दहावी उत्तीर्ण आहे. विवाहानंतर वेगवेगळ्या कारणावरून वाद घालून छळ करण्यात आला, असे फिर्यादीत म्हटले आहे. अपत्य प्राप्ती होत नसल्याने आरोपींनी जादूटोणा तसेच अघोरी उपाय करण्यास सुरवात केली. आरोपी गुरुजी यांनी मंत्र-तंत्राच्या नावाखाली छळ केला, असेही फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या पत्नीने छळ प्रकरणात आणखी एक स्वतंत्र फिर्याद दिली असून तिने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक बाळासाहेब बढे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

“वयाचं गणित फेल!” – सुबोध-रिंकूच्या जोडीनं सोशल मीडियावर रंगली ट्रोलिंग, रिंकू- सुबोधच्या वयात नक्की किती अंतर आहे?

Latest Marathi News Live Updates : निम्न दूधनाचा पाणीसाठा ७० टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT