crime 
पुणे

धक्कादायक, महिलेवर अतिप्रसंग करण्याचा आठ जणांकडून प्रयत्न 

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील क्रीडा संकुलला जवळ असलेल्या एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आठ जणांनी तीस वर्षाच्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या वेळी आरोपींनी महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. पण, तिच्या मदतीसाठी काही मजूर धावून आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

या प्रकाराबाबत पीडित महिलेने मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंचर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून 5 आरोपींना अटक केली आहे. त्यातील तीनजण फरारी असून, त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. आनंद उर्फ सोन्या सुधीर नाटे (वय 29), विजय उर्फ पप्पू नंदकुमार मोरडे (वय 27, दोघेही रा. मंचर), राम उर्फ बाळे शिवाजी काळे (वय 31), सिद्धार्थ उर्फ गोट्या गौतम गायकवाड (रा. चांडोली बुद्रुक), संतोष उर्फ पप्पू हरिचंद्र शिंदे (अवसरी खुर्द) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. ओंकार उर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले, पवन सुधीर थोरात, तुषार नितीन मोरडे (सर्व रा. मंचर) हे तीन आरोपी फरारी झाले आहेत.


संबंधित महिला रडत असताना एका जागरूक नागरिकाने थेट मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना मोबाईल केला. त्यानंतर खराडे व पोलिस पथक ताबडतोब घटनास्थळी आले. तोपर्यंत आरोपी निघून गेले होते. महिलेचा विनयभंग व जिवे मारण्याची धमकी, असा गुन्हा मंचर पोलिसांनी दाखल केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : 'भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी कोणालाही सोडणार नाही'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा, रूपाली चाकणकरांबाबत काय म्हणाले?

5 वर्षांनी स्वामींच्या भूमिकेला दिला निरोप! अक्षयची 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतून एक्झिट, 'हे' ज्येष्ठ अभिनेते साकारणार भूमिका

Latest Marathi News Live Update : सातारा जिल्हा परिषद निवडणूक मुद्द्यावर मंत्री शंभुराज देसाई आक्रमक

Pregnant Woman Rescue: माणुसकी अजूनही जिवंत; जीवन संपवण्यासाठी डोंगरावर चढलेल्या गर्भवतीचा वाचविला जीव, खाण ८० फूट खाेल, युवकांची काैतुकास्पद कामगिरी!

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीनंतर बाजारात धुमाकूळ! 1 मिनिटातच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स तोट्यात?

SCROLL FOR NEXT