crime news esakal
पुणे

एकतर्फी प्रेमातून चाकूच्या धाकाने अपहरण करणाऱ्या मजनूवर गुन्हा

एकतर्फी प्रेमातून चाकूचा धाकाने मजनूचे अपहरण ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर,’ असे म्हणणाऱ्या सराईताला चावा घेतला.

सकाळ वृत्तसेवा

एकतर्फी प्रेमातून चाकूचा धाकाने मजनूचे अपहरण ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर,’ असे म्हणणाऱ्या सराईताला चावा घेतला.

पुणे - एकतर्फी प्रेमातून चाकूचा (Knief) धाकाने मजनूचे अपहरण (Kidnapping) ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर,’ असे म्हणणाऱ्या सराईताला (Criminal) चावा घेतला. येरवड्यातील साळवेनगर येथे शनिवारी (दि. 16 एप्रिल 2022) रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. काही दिवसांपूर्वी एकतर्फी प्रेमातून शाळेत शिरुन अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला (Attack) करण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर येरवड्यामध्येच हा दुसरा प्रकार घडला आहे.

सराईत गुन्हेगार निहाल विशाल भाट (रा. कंजारभाट, येरवडा) याच्याविरुद्ध अपहरण, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, तरुणी घरात असताना शनिवारी रात्री साडेनऊ वाजता निहाल तेथे आला. हातात चाकू घेऊन तो तिच्या घरासमोर उभा राहिला. ‘तू घराबाहेर ये, माझ्या सोबत चल असे म्हणून त्याने हातातील चाकू हवेत फिरवून तू जर बाहेर आली नाही तर, मी दरवाजा तोडून घरात घुसेल व मला कोणी अडविण्याचा प्रयत्न केला तर, मी त्याला जिवंत सोडणार नाही,’अशी धमकी दिली. त्यानंतर भाट याने चाकूचा धाक दाखवून या तरुणीला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून स्वत:च्या घरी घेऊन गेला. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे़ माझ्यासोबत लग्न कर’ असे तिला म्हणाला. त्याला तिने नकार दिल्यावर त्याने या तरुणीच्या तोंडावर मारहाण करुन दंडावर, पाठीवर, गालावर दाताने चावे घेऊन जखमी केले. तसेच हातातील चाकूने उजव्या पायाच्या गुडघ्यावर मारुन जखमी केले. या तरुणीने स्वत:ची सुटका करुन घेतली.

जखमांवर उपचार केल्यानंतर रविवारी तिने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक गोताडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

SCROLL FOR NEXT