पुणे

खेड शिवापूर आंदोलनप्रकरणी रिपब्लिकन कार्यकर्त्यांवर गुन्हा

CD

नसरापूर, ता. ४ ः मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होत असल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. २) जून रोजी खेड शिवापूर टोलनाका येथे रिपब्लिकनच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. परवानगी न घेता आंदोलन करून सरकार विरोधी घोषणा देत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्याच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य शासन पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करून जातीयवाद निर्माण करत आहे असा आरोप करत भोर, राजगड (वेल्हे) व हवेली येथील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी टोलनाका येथे जमून शासनाच्या विरोधात आंदोलन केले. मात्र या आंदोलनास कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे सांगून राजगड पोलिसांनी याबाबत कारवाई सुरू केली आहे. राजगड पोलिस ठाण्याचे हवालदार भागिरथ घुले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. प्रवीण सदाशिव ओव्हाळ (रा. खेड शिवापूर), विनोद गायकवाड, अविनाश गायकवाड, नवनाथ कदम, किशोर अमोलिक, मिलिंद जगताप, महेंद्र साळुंखे, अभिषेक वैराट, सागर जगताप, आकाश गायकवाड, आकाश कांबळे या विविध पदावरील पदाधिकाऱ्यांसह इतर कार्यकर्त्यांनी एकत्र येत बेकायदेशीर जमाव जमवून शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी, भाषणे करून भित्तिपत्रके फाडून निदर्शन आंदोलन करून आंदोलनाच्या शेवटी अचानक प्रतिकात्मक पुतळा आणून त्यास पेटवून सरकारविरोधी घोषणा दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचापुढील तपास फौजदार दाजी देठे करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT