पुणे

शिवऋण प्रतिष्ठानच्या अक्षय बोऱ्हाडेविरुद्ध गुन्हा

दत्ता म्हसकर

जुन्नर - महिला व बालविकास विभागाची मान्यता न घेता शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथे शिवऋण प्रतिष्ठान नावाने अनधिकृत संस्था सुरू केल्याच्या आरोपावरून संस्थाचालक अक्षय मोहन बोऱ्हाडे रा.शिरोली बुद्रुक ता.जुन्नर जि.पुणे याचे विरुद्ध जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बोऱ्हाडे याने शिवऋण प्रतिष्ठान संस्थेत सात लहान मुले विना परवानगी ठेवली होती. पुणे येथील बालकल्याण समिती सदस्य अर्जुन लक्ष्मण दांगट यांनी याबाबत जुन्नर पोलिसांकडे मंगळवारी ता.29 रोजी सांयकाळी तक्रार दिली. त्यानुसार बालन्याय अधिनियम 2015 कलम 42 अन्वये बोऱ्हाडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांनीं सांगितले.

गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात बोऱ्हाडेला आळेफाटा पोलिसांनी अटक केली. त्याच्या मनोरुग्ण संगोपन केंद्रातील रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणून 20 डिसेंबर रोजी जुन्नर पोलिसांनी येथील 53 मनोरुग्ण हलविले यावेळी येथे लहान मुले असल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांच्या कारवाई दरम्यान येथे कोणतीही परवानगी न घेता ही बालके संस्थेत ठेवली असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे ही कारवाई करण्यात असली असल्याचे नलवडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IRE vs AFG: विराट कोहली-शिखर धवनलाही टाकलं मागे, अफगाणिस्तानच्या ओपनरची विक्रमी शतकासह पीटरसनच्या क्लबमध्ये एन्ट्री

नाशिक-रायगडमध्ये कोण करणार ध्वजारोहण? मंत्र्यांची यादी जाहीर; पाहा तुमच्या जिल्ह्यात कोण?

Organ Donate : दुःखातही अवयवदानाचा निर्णय! मुळेकर कुटुंबीयांच्या त्‍यागाने चौघांना जीवदान

जखमी हत्तींच्या मदतीला धावली 'एलिफंट ब्रिगेड'; पलामूमध्ये ४ पाळीव हत्तींचे अनोखे पथक

Tukaram Mundhe: आता कारवाई थांबणार नाही! तुकाराम मुंढेची ताकद अजून वाढणार; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले...

SCROLL FOR NEXT