पुणे

नारायणगाव : सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी सहा तरुणांवर गुन्हा

रवींद्र पाटे

नारायणगाव : सोशल डिस्टन्सचे पालन न करता व बिगरपरवानगी येथील ग्रामदैवत मुक्ताबाई देवस्थान प्रवेशद्वारा समोर सार्वजनिक ठिकाणी  वाढदिवस साजरा करून आक्षेपार्ह वर्तन केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी सहा तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सकलेन नासिर आत्तार, साकीर आमीन जमादार, आरमान खालीद शेख, मोईन एकलाक आत्तार, मोसीन फिरोज ईनामदार, जाहीद पिर मंहम्मद पटेल (सर्व राहणार  मुस्लीम मोहल्ला नारायणगाव ता जुन्नर) या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक डी. के.गुंड यांनी दिली.

सकलेन नासिर शेख( वय १८) याचा वाढदिवस १३ डिसेंबर २०२० रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या  सुमारास ग्रामदैवत मुक्ताबाई देवस्थान प्रवेशद्वारा समोर साजरा केला. या वेळी सकलेन  शेख याला इतर पाच आरोपींनी अंडी फेकून मारली व सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होईल असे वर्तन केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. देवस्थान समोर केलेल्या या वर्तनाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. गुंड यांनी या घटनेची दखल घेऊन सहा जणांवर गुन्हा दाखल केला.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Katraj News : भारती विद्यापीठ भागात हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भडका; चारजण जखमी

Manchar Crime : मंचर येथे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले; एसीबीची कारवाई

SCROLL FOR NEXT