cri.jpg 
पुणे

मैत्रिण ब्लॅकमेल प्रकरण आले अंगाशी; दोन भावांवर गुन्हा

सकाळवृत्तसेवा

पुणे : सेल्फी सोशल मिडीयावर अपलोड करण्याची धमकी देत मैत्रिणीला ब्लॅकमेलिंग करणाऱ्या दोघा सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देऊन त्यांनी मोबाईल आणि रोकड उकळल्याचे तपासातून समोर आले आहे. 

कोथरुड येथे रहाणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीने या बाबत फिर्याद दिली आहे. त्यानूसार वैभव दिलीप कातोरे आणि रोशन दिलीप कातोरे (दोघे रा. ओंकारपुरम सोसायटी, कोथरुड) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि वैभव कातोरे हे मुळचे नाशिकचे आहेत. शिक्षण घेत असताना त्यांची एका कोचिंग क्‍लासमध्ये मैत्री झाली होती. यानंतर शिक्षण झाल्यावर संबंधीत तरुणी पुण्यात नोकरीसाठी दाखल झाली. याकाळात वैभवने तीच्याशी मैत्री ठेवली. दरम्यान तोही भावासह पुण्यात रहायला आला. येथे आल्यावर त्याने वारंवार फोन करुन फिर्यादीला लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली. तिच्या कंपनीमध्ये येऊनही तो फिर्यादी आपली बायको असून तिच्याशी नीट वागायचे, असा दम तेथील कर्मचाऱ्यांना देत होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान त्याने एकदा तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीचे लग्न इतर मुलाबरोबर ठरल्यावर त्याने आपला सेल्फी सोशल मिडियावर अपलोड करेल आणि नवऱ्या मुलाला पाठवेल, अशी धमकी तिला दिली. यानंतर तिला जबरदस्तीने सात हजार 500 रुपये पाठविण्यास सांगितले. तर  रोशन याने तिला भेटून वैभवला फोन घेऊन दे असे सांगत जबरदस्तीने 14 हजाराचा फोन घ्यायला लावला. वैभव हा सध्या बेरोजगार आहे. तर रोशन हा सीओईपी महाविद्यालयात इंजिनिअरींगचे शिक्षण घेतो. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक किरण बालवडकर करत आहेत.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पंजाबमध्ये माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT