police.jpg 
पुणे

पुणे : दारु पिऊन त्यांनी चक्क महिला पोलिसालाच...

सकाळवृत्तसेवा

पुणे : मद्यपान करुन रस्त्यावर गोंधळ करणाऱ्या तरुणांना घरी जाण्यास सांगणाऱ्या महिला पोलिस कर्मचाराऱ्याला धमकी देणाऱ्या दोघांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजता विश्रांतवाडी पोलिस वसाहतीसमोर घडली.

सुबोध लोखंडे (वय.20), प्रकाश ऊर्फ टग्या जाधव (वय.25,  दोघेही रा. विश्रांतवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी महिला पोलिस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पोलिस कर्मचारी या विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात नेमणूकीस आहेत. त्या दैनंदिन कर्तव्यावर असताना रविवारी सायंकाळी सात वाजता दोन तरुण सार्वजनिक रस्त्यावर भांडण करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार फिर्यादी व साप्रस बीट मार्शल घटनास्थळी गेले. त्यावेळी संबंधित तरुण संचार मनाई आदेशाचा भंग करून सार्वजनिक रस्त्यावर दारू पिऊन, तोंडाला मास्क न लावता निदर्शनास आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

फिर्यादींना दोघांना समजावून घरी जाण्यास सांगितले. त्यावेळी सुबोध लोखंडे हा त्यांच्या फिर्यादीच्या अंगावर धावून आला. त्याने "मी लाईन बॅाय आहे तुला काय करायचे ते कर" अशी धमकी देत फिर्यादींना धक्काबुक्की केली. तर प्रकाश जाधव याने "आम्ही जात नाही तुला काय करायचे ते कर तुला बघून घेतो" अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी  सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस मुख्यालयाच्या उपायुक्तांकडून दोन दिवसांपूर्वीच शहरातील सर्व पोलिस वसाहतींसाठी एक नियमावली तयार केली. या नियमावलीनुसार वसाहतीतील सर्व रस्ते बंद करून एकाच मार्गाने प्रवेश देण्याचे आदेशात नमुद केले आहे. तसेच वसाहतीतुन बाहेर ये-जा करणाऱ्याची नोंद ठेवण्यास बजावले आहे. तसेच अत्यावश्यक कामाशिवाय सतत बाहेर जाणाऱ्या व जातील, वारंवार सुचना देऊनही न एेकणाऱ्याची माहिती जवळच्या पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना देण्यास सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

Pune Bangalore Highway Accident : देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला! पुणे–बंगळूर महामार्गालगत पिकअप पलटी; 11 भाविक जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

ग्लेन फिलिप्स फक्त मैदानातच उडत नाही, तर आकाशात विमानही उडवतो; स्वत:च शेअर केला Video

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

SCROLL FOR NEXT