Crime pune sakal
पुणे

Pune Crime: ८ चारचाकी, ९ मोटार सायकल चोरणारे 'बंटी बबली' गजाआड!

Pune : पती-पत्नीकडून एकूण १७ वाहनांच्या चोरीचे गुन्हे उघड, पोलीसांची मोठी कारवाई

जागृती कुलकर्णी, विठ्ठल तांबे

Sinhgad Dhayari : चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे गंडा घालत वाहन चोरी करून नंतर ते भंगार मध्ये विकणे आणि पैसा कमवणाऱ्या प्रत्यक्षातील 'बंटी-बबली' ला सिंहगड पोलिसांनी अखेर गजाआड केले

सिंहगड रस्ता पोलीसांनी वाहनचोरी करणाऱ्या पती-पत्नीकडून ८ चारचाकी आणि ९ मोटार सायकली असे एकूण १७ वाहनांच्या चोरीचे गुन्हे उघड केलेत.

सुमारे १२,७०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.  'बंटी अ‍ॅंड बबली' स्टाईलने ते चोऱ्या करत होते. यातील महिलेची नुकतीच प्रसुती झाली असून दीड महिन्याचे बाळ आहे. शाहरुख राजू पठाण आणि आयेशा शाहरुख पठाण (वय २१, दोघेही राहणार कुंजीर नगर, मूळ पत्ता वार्ड नंबर ५ निरा, ता. बारामती) अशी आरोपींची नावे आहेत.

दोघेही सराईत असून दोघांवर विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत. फेब्रुवारी महिन्यात ते तुरुंगातून जामिनावर सुटले आहेत. आयेशा ही गर्भवती असताना सुद्धा चोऱ्यांच्या उद्योगात सामील होत होती.

तपास पथकातील पोलीस अंमलदार उत्तम तारु, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर यांना माहिती मिळाली की, एक पुरुष आणि एक महिला संशयास्पद रित्या लोणीकाळभोर येथील वडकीनाला भागामध्ये रस्त्याच्या कडेला एका कारमध्ये बसले आहे. दोघे मिळून चारचाकी आणि दुचाकी वाहन चोरी गुन्हे करत आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर आणि त्यांच्या पथकाने या दोन संशयीतांना ताब्यात घेतले.‌ अटक करुन चौकशी केली असता, आरोपींनी संपूर्ण पोलीस आयुक्तालयात हद्दीत १७ दुचाकी व चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

त्यातील चोरी केलेल्या एकुण ८ चारचाकी व ९ दुचाकी वाहने असा मुददेमाल आरोपींनी जप्त केला. आरोपी पती पत्नी असून ते पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर राहून दिवसभर टेहळणी करत. रात्री बाहेर पडून चारचाकी, दुचाकी वाहने चोरी करत.

दोघे गाडीत असल्याने कोणालाही संशय येत नसे. ही वाहने आरोपींनी नागपूर, शिर्डी, श्रीरामपूर येथे विकली होती. गुन्हयातील एकुण १७ वाहने असे एकुण १२,७०,००० किंमतीचा मुददेमाल जप्त करण्या आला आहे.

सचिन निकम आणि संतोष भांडवलकर यांच्या पथकाने सलग दोन महिने दोघा आरोपींचा मागोवा घेतला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह आयुक्त प्रविण पवार, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त परीमंडल ३ संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, राजु देगरे, विकास बांदल, अमोल पाटील, विकास पांडोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वनील मगर, विनायक मोहिते, शिरीष गावडे या पथकाने सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hinjewadi IT Park : हिंजवडी आयटी पार्कमध्ये १०० हून अधिक एनएसजी कमांडोंचा ताफा; बुधवारी रात्री पुण्यातील आयटी पार्कमध्ये थरार

WTC Points Table Update : पाकिस्तानच्या विजयानंतर गुणतालिकेत उलथापालथ; भारताचे फायनलमध्ये पोहोचण्याचे समीकरण बिघडले?

लोकसभेत मोठा ट्विस्ट! विरोधकांच्या २२ खासदारांमुळे गणित बदलणार! दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यापासून NDA किती दूर?

Marathi News Live Updates : प्रशांत किशोर सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल

Para Athletics: राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या मराठमोळ्या दिलीप गावितचा निर्धार; पॅरा आशियाई स्पर्धेत जागतिक विक्रमाचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT