Crime 
पुणे

रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी आठ डॉक्‍टरांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याने आठ डॉक्‍टर व खासगी रुग्णालयाच्या संचालक मंडळासह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित रुग्णालयास बेकायदा परवाना दिल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गणेश तात्याबा गोरे (रा. नऱ्हे) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. याप्रकरणी काशिनाथ सौदागर तळेकर (वय ६९, रा. मगरपट्टा सिटी) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून डॉ. सलमानखान बशीरखान पठाण, डॉ. तेजस्विनी भगवान वाघमारे, डॉ. अभिनंदन सुभाष बुद्रुक, डॉ. दीपक विजय शिंदे, डॉ. महेश महादेव दरेकर, डॉ. पुष्कर शहा, डॉ. सचिन मोहन लकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, आधार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सिटरीन हेल्थकेअर प्रायव्हेट लि. यांच्यासह जमिनीचे मालक दशरथ चंद्रकांत वाल्हेकर, नामदेव चंद्रकांत वाल्हेकर, जयश्री चंद्रकांत वाल्हेकर, आकाश नामदेव वाल्हेकर, अजिंक्‍य नामदेव वाल्हेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तळेकर यांचे मेहुणे गणेश यांना २१ जुलै २०१८ रोजी हृदयविकाराचा झटका आला. फिर्यादीने त्यांना तत्काळ आधार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या वेळी डॉ. पठाण यांनी रुग्णावर उपचार सुरू केले. त्यांनी ईसीजी काढून हृदयरोगतज्ज्ञ डॉ. लकडे यांना व्हॉट्‌सॲपद्वारे पाठविला. त्यांच्या सूचनेनुसार डॉ. पठाणने रुग्णास तीन तास उशिराने ‘इलॅक्‍झीन ३०’ हे इंजेक्‍शन दिले. त्यानंतर डॉ. वाघमारे रुग्णास रुग्णवाहिकेमध्ये घेऊन गेल्या. काही अंतर गेल्यानंतर त्या रुग्णास घेऊन पुन्हा रुग्णालयामध्ये आल्या. रुग्णास वेळेत योग्य उपचार मिळाले नाहीत. तसेच डॉ. पठाण, डॉ. शहा व डॉ. शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. जमिनीचे मूळ मालक व रुग्णालय प्रशासन यांनी करारनाम्यातील अटींचा भंग केला. संगनमत करून बनावट दस्तऐवजांद्वारे रुग्णालयाचे बेकायदा बांधकाम केले. डॉ. माने यांनी रुग्णालयाच्या इमारतीला बेकायदा परवाना दिल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक केतन थोरबोले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT